अमित ठाकरे यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसाठी राज्य सरकार, महापालिका सत्ताधारी आणि प्रशासनाला जबाबदार धरत जोरदार टीका केली आहे.Amit Thackeray angry, says corrupt people can be punished only in people’s court
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यभरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरुन आता राजकीय वातावरण चांगलच तापलेले दिसतंय. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खड्ड्यांच्या उपाययोजनांबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक बोलावली होती. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही खड्ड्यांबाबत आपल मत मांडल आहे.
अमित ठाकरे यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसाठी राज्य सरकार, महापालिका सत्ताधारी आणि प्रशासनाला जबाबदार धरत जोरदार टीका केली आहे. अमित ठाकरे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
पोस्टमध्ये अमित ठाकरे म्हणाले की , “रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, तसेच वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय. खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल”
कोण आहेत अमित ठाकरे ?
अमित ठाकरे हे राज ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. अमित ठाकरे हे गेल्या काही वर्षांपासून मनसेत सक्रिय झाले आहेत.त्यांच्याकडे सध्याच्या काळात मनसेच्या नेतेपदाची जबाबदारी आहे. नव्या पिढीचे प्रतनिधी असलेले अमित ठाकरे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांच्याबद्दल मनसेच्या तरुण कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड कुतुहल आहे.
यावेळी अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून रस्त्यावर पडलेल्या खड्यांवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. अमित ठाकरे हे विद्यार्थी आणि तरुणांचे प्रश्न पक्षाच्या माध्यमातून नेहमी मांडत असतात. कोरोना लॉकडाऊनच्या काळात त्यांनी डॉक्टर,शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांकडे सरकारच पत्राद्वारे लक्ष वेधल होत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App