विशेष प्रतिनिधी
लखनऊ : इस्लामी धर्मगुरूकडून धर्मपरिवर्तनाचे फायदे समजावून घेत असलेल्या आयएएस अधिकाऱ्याच्या पाठिंब्यासाठी आता एआयएमआयचे प्रमुख खासदार असुद्दीन ओवेसी सरसावले आहेत. धर्माच्या नावाखाली त्यांचा छळ केला जात असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला आहे. Asuddin Owaisi supports IAS officer in conversion case, accused of harassment in the name of religion
आईएएस अधिकारी मोहम्मद इफ्तिखारुद्दीन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये या अधिकाऱ्याच्या उपस्थितीतच धर्मपरिवर्तनाचे फायदे समजावून सांगितले जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ ज्येष्ठ आयएएस अधिकारी मोहम्मद इफ्तखारूद्दीन यांच्या सरकारी निवासस्थानातील आहे. यामध्ये धर्मपरिवर्तन आणि त्याच्याशी संबंधित बाबी सांगितल्या जात आहेत. यात एक इस्लामिक गुरू समोर खुर्चीवर बसले असून त्यांच्यासमोर जमिनीवर काही मुस्लिम बांधव बसले आहेत. त्यांच्यामध्येच आयएएस अधिकारी मोहम्मद इफ्तखारुद्दीन देखील बसलेले दिसत आहेत.
खुर्चीवर बसलेले इस्लामिक गुरू इस्लाम धर्म स्वीकारण्याचे फायदे सांगत आहेत. उत्तर प्रदेशच्या माध्यमातून अल्लाहने आपल्याला असं केंद्र उपलब्ध करून दिलं आहे, जिथून आपण देशभर आणि जगभर काम करू शकतो, असं म्हणताना देखील हे इस्लामिक गुरू दिसत आहेत.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मठ मंदिर सहकारी समितीचे उपाध्यक्ष भूपश अवस्थी यांनी आयएएस अधिकारी मोहम्मद इफ्तखारूद्दीन यांच्यावर हिंदुत्वविरोधी कारवाया करण्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण गावे यांनी अतिरिक्त उपायुक्त सोमेंद्र मीणा यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आयएएस अधिकारी मोहम्मद इफ्तखारुद्दीन यांचा हा व्हायरल व्हिडीओ तपासला जात आहे. हा व्हिडीओ खरा आहे का आणि त्यामध्ये काही गुन्हा घडला आहे का? याची चाचपणी केली जात आहे, अशी माहिती कानपूर नगर पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे. मोहम्मद इफ्तिखारुद्दीन हे १९८५ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते लखनऊमध्ये पोस्टिंगवर आहेत. त्यांच्याकडे उत्तर प्रदेश राज्य रस्ते परिवहन महामंडळाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
मोहम्मद इफ्तिखारुद्दीन यांना पाठिंबा देत केलेल्या ट्विटमध्ये ओवेसी यांनी म्हटले आहे की, त्यांची धर्माच्या नावाखाली छळवणूक केली जात आहे. हा व्हिडीओ सहा वर्षांपूर्वीचा असून त्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे. त्यावेळी उत्तर प्रदेशात आत्ताचे सरकार सत्तेवरही नव्हते. कोणा अधिकाऱ्याला धार्मिक कार्यात सहभागी होण्यास बंदी असेल तर सर्व सरकारी कार्यालयातील धार्मिक प्रतिके आणि प्रतिमा काढून टाका. त्याचबरोबर सार्वजनिक जीवनात धार्मिक उत्सवात सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांनाही शिक्षा करा.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App