
विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थान मध्ये नुकताच घेण्यात आलेल्या REET या रिक्त शिक्षक पद भरती साठी घेण्यात आलेल्या परीक्षेमुळे पून्हा एक वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने रविवारी परीक्षे दरम्यान झालेल्या काही गैर प्रकाराचे आरोप केल्यामुळे प्रशासकीय सेवा अधिकारी, दोन पोलीस सेवा अधिकारी, 13 शिक्षण विभागाचे कर्मचारी आणि इतर तीन पोलिसांना निलंबित केले होते.
REET 2021 : Due to irregularities during exam, angry students has announced protest
या मध्ये सवाई माधोपूर जिल्ह्य मधील वजीरपूरचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र कुमार मीना (आरएएस अधिकारी) आणि दोन आरपीएस अधिकारी नारायण तिवारी आणि राजूलाल मीना यांचा समावेश आहे.
या परीक्षे दरम्यान सुव्यवस्थेचा अभाव असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी पेपर फुटणे, पेपर उशिरा येणे असे प्रकार काही केंद्रावर झाले होते. ही माहिती राजस्थान बेरोजगार युनायटेड फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष उपेन यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली. या अनियमिततेमुळे बेरोजगार तरुण संतप्त आहेत अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी या मागणीसाठी युवक 30 सप्टेंबर रोजी शहीद स्मारक येथे आंदोलन करतील, असेही ते म्हणाले.
भाजप नेत्यांनी या बाबतीत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आता त्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते रामलाल शर्मा म्हणाले की, राज्य सरकारचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे त्यावरून हे सिद्ध होते की परीक्षे दरम्यान अजूनही बराच गोंधळ झाला होता. तर आता राज्य सरकारने या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करावी असेही त्यांनी म्हटले आहे.
REET 2021 : Due to irregularities during exam, angry students has announced protest
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपवर तोफा डागत तृणमूळची काँग्रेस फोडाफोडी, शिवसेनेची गोव्यावर स्वारी
- उत्तर कॅलिफोर्नियातील इटालियन व्हरायटीच्या सफरचंदाला मोदींचे नाव
- EXCLUSIVE : Only Agenda-Modi Hate: कॉंग्रेसची गुंडगिरी-भाई जगतापांचा प्रताप! नरेंद्र मोदींवरील अभद्र मीमला उत्तर-अभिनेता रणवीर शौरींना धमकी ; शौरी म्हणाले हा फक्त मोदी-द्वेष
- मेंदूचा शोध व बोध : दिवसभरात अधून – मधून क्षणस्थ व्हायला शिका