विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील गोरेगावमधील आरे कॉलनी भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा वावर वाढल्याने रहिवासी घाबरले आहेत. आता तर बिबट्याचा एक बछडा आढळला. त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी आरे कॉलनी युनिट नंबर २२ मेट्रो कार सीटच्या खाली हा बछडा आढळला. त्यानंतर रहिवाशांनी बोरवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क वनविभागात त्यांना कॉल करून ही माहिती दिली. या बछड्याला त्यांनी वनविभागाला सुपूर्द केले.
https://www.youtube.com/watch?v=Uic6rrMZVnE
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App