विशेष प्रतिनिधी
डेहराडून – चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने उत्तराखंडातील बाडाहोती भागामध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.चमोली जिल्ह्यातील बाडाहोती येथे “नो मॅन्स लँड`मध्ये यापूर्वी चीनचे सैनिक येत असल्याचे दिसून आले आहे.Chinas army will come in no mans land zone
मात्र गेल्या महिन्यात पहिल्यांदा त्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैनिकांची हालचाल दिसून आल्याचे सूत्रांनी सांगितले.चमोली जिल्ह्यातील बाडाहोती भाग हा गवताळ प्रदेश आहे. तिबेटमधील गुराखी या भागात नेहमी येत असतात. १९६२च्या युद्धापूर्वी उत्तराखंडातील निती खोऱ्यातही तिबेटमधून गुराखी येत असत.
मात्र युद्धानंतर त्यांचे येणे बंद झाले.गेल्या काही महिन्यांत चिनी सैनिक या भागात आल्याचे दिसून आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार ३० ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर चिनी सैनिक येथे आले होते. येथून जवळच तिबेटमधील दाफा गाव आहे. येथील सीमेवर इंडो-तिबेट सीमा पोलिसांची गस्त असते. सीमेच्या पलीकडे चीनच्या लष्कराची चौकी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App