महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर जगात सर्वाधिक, शाळा-महाविद्यालयांवर बंदीची कुऱ्हाड चालविणाऱ्या सरकारला उपचाराच्या सुविधा देणे जमेना

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शाळा, महाविद्यालयांपासून ते सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदीची कुऱ्हाड चालविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला रुग्णालयांत पुरेशा सुविधा देणे मात्र शक्य झालेले नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा मृत्यूदर जगात सर्वाधिक आहे.Maharashtra’s corona mortality rate is highest in the world.

राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या अहवालातून कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा जास्त आहे. राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचा दर हा 31 मे, 2021 रोजी 0.37 होता जो 27 सप्टेंबर, 2021 ला 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.



याचा अर्थ रुग्णवाढ लक्षणीयरित्या कमी झाली आहे. रुग्ण बरं होण्याचं प्रमाणही 97.26 टक्क्यांवर पोहोचले आहे. पण त्याचवेळी मृत्यूदर मात्र वाढला आहे. 31 मे रोजी 1.66 टक्क्यांवर असलेला मृत्यू 31 आॅगस्टला 2.12 वर पोहोचला. जो 27 सप्टेंबरला वाढला नाही. पण कमीही झालेला नाही. जैसे थेच राहिला आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाचा मृत्यूदर हा जगातील कोरोना मृत्यूदरापेक्षाही जास्त आहे. जगातील कोरोना मृत्यूदर हा 2.05 टक्के आहे पण महाराष्ट्रात हा 2.12 आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील कोरोनाचा मृत्यूदर हा जगातील कोरोना मृत्यूदरापेक्षाही जास्त आहे. जगातील कोरोना मृत्यूदर हा 2.05 टक्के आहे पण महाराष्ट्रात हा 2.12 आहे.

Maharashtra’s corona mortality rate is highest in the world.

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात