माझे कुटुंब, माझी जबाबदारीनंतरही कोरोना वाढतोयच, अमेरिका, ब्राझीलनंतर महाराष्ट्राचाच क्रमांक

देशातील बहुतांश राज्यांत कोरोनाला रोखण्यात यश मिळाले आहे. मात्र, माझे कुटुंब, माझी जबाबदारीसारख्या नुसत्याच घोषणा करण्यात आल्याने महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक मात्र वाढत आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्राचा क्रमांक लागत आहे.Even after My family my responsibilities Corona is growing Maharashtra ranks after USA and Brazil


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशातील बहुतांश राज्यांत कोरोनाला रोखण्यात यश मिळाले आहे. मात्र, माझे कुटुंब, माझी जबाबदारीसारख्या नुसत्याच घोषणा करण्यात आल्याने महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक मात्र वाढत आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्राचा क्रमांक लागत आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये येथे 30 हजार 535 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. साथ सुरू झाल्यानंतर आतापर्यंत सर्वाधिक प्रकरणे आहेत. राज्यात 99 लोकांचा व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. एका दिवसात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्र जगात तिसºया क्रमांकावर आहे. महाराष्ट्रापेक्षा जास्त केवळ अमेरिका आणि ब्राझीलमध्ये क्रमश: 39,496 आणि 47,774 प्रकरणे मिळाली आहेत.महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था कोरोनाच्या धक्यानंतरही सुधारलेली नाही. केंद्र सरकारकडून दिलेल्या मदतीचा विनियोगही महाराष्ट्रात योग्य पध्दतीने झाला नाही. पीएम केअर फंडातून महाराष्ट्रासाठी देण्यात आलेल्या व्हेंलिटेलरचाही वापर केला जात नसल्याचे दिसून येत आहे.

भुसावळ येथील जिल्हा रुग्णालयात पीएम केअर फंडातून दहा व्हेंलिटेलर देण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारला याठिकाणी कुशल मनुष्यबळ नियुक्त करता आले नाही. त्यामुळे व्हेंलिलेटर उपलब्ध असूनही तीन जणांचा मृत्यू झाला होता. दुसºया बाजुला महाराष्ट्रातील चाचण्यांची संख्या आणि कोरोना लसीकरणाचे प्रमाणही जास्त आहे. उपलब्ध असलेली कोरोना लस वाया जाण्यातही महाराष्ट्रच आघाडीवर आहे.

मध्यंतरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी उपक्रम राबविला. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखता आलेले नाही. राज्यात एकूण संक्रमित 24 लाख 79 हजार 682 झाले आहेत. येथे मृतांची संख्या वाढून 53 हजार 399 झाली आहे. शनिवारी महाराष्ट्रात 27 हजार 126 हजार 126 केस आल्या होत्या आणि 92 लोकांचा मृत्यू झाला होता. या दरम्यान 11,314 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ज्यानंतर राज्यात एकूण 22,14,867 रुग्ण बरे होऊन घरीही गेले आहेत आणि रिकव्हरी रेट 90.79 टक्के आहे

Even after My family my responsibilities Corona is growing Maharashtra ranks after USA and Brazil

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*