वृत्तसंस्था
बंगळूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे हिटलरच्या वंशांचे असून भाजप हा तालिबानी आहे, असा जावईशोध कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लावला आहे. BJP are ‘Talibanis’, alleges Cong leader Siddaramaiah
गरिबांना रेशनकार्डचे वाटप आणि कोरोना काळात भरीव कार्य करणाऱ्या कोविड योद्धयाचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.राज्यात भाजप नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्ता चालवत असल्याचा आरोप करताना सिद्धरामय्या म्हणाले,
भाजप म्हणजे खोटे सांगण्याची फॅक्ट्ररी आहे. त्यांनी खोटेपणाचा बाजारच मांडला आहे. हिटलरच्या राजवटीत गोबेल्स नीती राबवली जात होती. त्या प्रमाणे भाजप राबवित आहे. खोटे बोल पण रेटून बोल, ही नीती भाजपने राबविल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजप नेहमी मागच्या दाराने सत्तेवर आला आहे, असा दावा करताना ते म्हणाले, भाजप हा जनतेतून निवडून आलेला पक्ष नाही.माजी मुख्यमंत्री बी. एस. यडीयुरप्पा यांनी ‘ऑपरेशन कमळ’ राबवून काँगेसचे आमदार पळवून भाजपाला सत्तेवर आणले. आता पक्षाने त्यांनाच दूर केले आहे.
त्यांच्या जागी संघाने बसवराज बोम्माई यांना मुख्यमंत्री केले. भाजप हा मुखवटा असून संघच सत्ता हाकत आहे.भाजप आणि संघाच्या कार्यालयात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो नाहीसे झाल्याचा आरोप त्यांनी केला. परंतु ते आता या राष्ट्रपुरूषांचा गौरव करत असल्याची नाटके करत आहेत, असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App