विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुंबई – महाराष्ट्रातून दोन नव्या बुलेट ट्रेन सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर प्रत्यक्ष काम रेल्वे मंत्रालयाने सुरू केल्याची बातमी आली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुलेट ट्रेनसंदर्भात पत्र पाठविल्याची बातमी पुढे आली आहे. मात्र, या पत्रात अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेनसाठी जमीन संपादनात महाराष्ट्रातील अडथळ्यांचा उल्लेख नसल्याचे समजते. maharashta CM uddhav thackeray writes a letter to PM naresndra modi for more bullet trains proposals
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. नाशिक-मुंबई, मुंबई-पुणे-हैद्राबाद या मार्गांवर बुलेट ट्रेन सुरू करण्यासंदर्भात हे पत्र असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये दोन बुलेट ट्रेन्सचा प्रस्ताव त्यांनी मोदी यांना दिला आहे. अर्थात या दोन प्रस्तावांचा उल्लेख आधी रेल्वे मंत्रालयानेही केला होता.
नागपूर-नाशिक-मुंबई ही एक बुलेट ट्रेन करण्यात यावी. तसेच समृद्धी महामार्गाला नांदेड-जालना असा मार्गही जोडला जाणार आहे. तोच मार्ग औरंगाबाद – पुणे – मुंबई असा करण्यात यावा आणि नांदेडवरून तो मार्ग पुढे हैद्राबादला जोडला जावा आणि हैद्राबाद – नागपूर – मुंबई अशी एक बुलेट ट्रेन करण्यात यावी. रेल्वे मंत्रालयाने लवकरात लवकर याचा विचार करावा. हैदराबाद आणि मुंबईचे मार्केट दोन्ही जोडता येईल, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी या पत्राद्वारे मांडला आहे. मात्र पूर्वीचा अहमदाबाद – मुंबई जोडणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गाविषयी मुख्यमंत्र्यांच्या पत्रात कोणताही उल्लेख केलेला नाही. या मार्गासाठी गुजरातमध्ये जमीन संपादन झाले आहे. महाराष्ट्रात मात्र जमीन संपादनात अडथळे आणले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App