विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : हैदराबाद येथील सुनीथ रेड्डी व शौर्यचंद्र या दोन तरुणांनी मिळून जंगल उभारणीचे काम हाती घेतले आहे. या प्रोजेक्ट मध्ये काही पूर्णवेळ काम करणारे शेतकरी जोडले गेले आहेत तर ज्या लोकांना पर्यावरणाची आवड आहे ते लोक आपल्या बिझी वेळापत्रकातून वेळ काढून सप्ताहाच्या शेवटी येतात. ऑरगॅनिक शेती, आरोग्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक जीवनशैली य गोष्टीवर भर देणारा हा प्रोजेक्ट आहे.
with the help of 160 farmers, this IIT student grew 400 acres of forest community
हैदराबाद येथील उद्योजक सुनीठ रेड्डीने पर्यावरणपूरक जीवन जगण्यासाठी शहर सोडले. “शहरातील गर्दी, धावपळीचे जीवन, प्रवासात जाणारा वेळ आणि आहाराच्या वाईट सवयी यामुळे शहरात राहणे त्रासदायक होत आहे. इतर अनेक लोकांप्रमाणेच शहरी जीवनाचा कंटाळा आल्यामुळे मी शहराबाहेर जाऊन शेती करुन निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचे ठरवले”. असे त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते. २०१५ – १६ साली त्यांने एक छोटी जमीन खरेदी करून ऑरगॅनिक शेती करण्याचा प्रयत्न केला आणि सुरुवातीच्या काही काळानंतर हा प्रयत्न यशस्वी झाला.
NIRF Rankings 2021 : मिरांडा हाउस बेस्ट कॉलेज, इंजिनिअरिंगमध्ये IIT मद्रास टॉप, शिक्षण मंत्रालयने जारी केली NIRF रँकिंग
पुढे बोलताना रेड्डी म्हणतात, त्यावेळी छोट्या प्रमाणावर शेती करण्यामधील आर्थिक आव्हान मला समजले. मी वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांशी बोललो आणि काही लोकांनी शेती घेऊन आठवड्यातील सुट्टीच्या दिवशी काम करण्यास सुरुवात केली. यातील काही लोक यशस्वी झाले. परंतु काही लोकांचा उत्साह कमी झाल्यामुळे किंवा काही वर्षांनंतर शेती टिकू न शकल्यामुळे काम बंद झाले. वेळोवेळी उद्भवणारे खर्च, इतर खर्च यामुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या ते अशक्य वाटू लागले. काही हंगामात चांगले पीक आले परंतु आवक एवढी चांगली नव्हती. जे पूर्णवेळ शेती करीत होते व त्यातच आपले लक्ष केंद्रित केले होते. ते लोक पार्ट टाइम काम करणाऱ्यापेक्षा यशस्वी झाले.
2017 मध्ये सुनीथने त्याचे जीवन बदलून टाकणारा निर्णय घेतला. त्याने कम्युनिटी फॉरेस्ट साठी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. शौर्यचंद्र व पाच सभासदांसह त्यांने ह्या नवीन आणि हटके प्रवासाची सुरुवात केली. हैदराबाद मधील 10 एकर जमीन विकत घेऊन सदर प्रकल्प सुरू झाला. शेतीपेक्षा जमिनीचा चांगला उपयोग करायचा होता. एक वर्षामध्ये आम्हाला आणखी सभासद मिळाले आणि वनीकरणाचे आमचे काम सुरू झाले. या कामाचा प्रमुख हेतू पर्यावरणाला योग्य असे जंगल तयार करणे हे होते. आम्ही येथे झाडे व स्थानिक वस्तूंचा वापर करून सर्व सोयींनी युक्त अशी घरे बांधली आहेत. निसर्गाला हानी न पोहोचवता व प्राण्यांना त्रास होऊ न देता आम्ही सर्व सभासदांनी वनीकरण केले आहे. सध्या १६० लोक ४०० एकर जमिनीवर काम करत आहेत.
जमिनीची मालकी सामायिक आहे. पाणी, टेकड्या आणि मैदाने यांचा सर्वजण समान उपयोग करतात. तसेच होणारे उत्पन्न सर्वांना प्रमाणात दिले जाते. रिटर्न ऑफ इनवेस्टमेंट म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी, प्रदुषणमुक्त व नैसर्गिक अन्न यातून मिळणारे आरोग्य दायी जीवन हेच अमूल्य आहे. मुंबई व चिकमंगलूरजवळ १००० एकर जमीन खरेदी करण्याचा विचार आहे. सुनिथ म्हणतो की, “निसर्गाशी जोडले जाऊन निसर्ग व मानवाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे हेच आमचे ध्येय आहे.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App