विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – भारत हा दहशतवादाला बळी पडत असलेला देश असल्याचे अमेरिकेच्या उपाध्यक्षा हॅरिस यांनी मान्य केले. पाकिस्तानने दहशतवाद्यांना कायम पाठबळ दिले आहे. अनेक दहशतवादी गट पाकिस्तानात सक्रीय आहेत. भारत आणि अमेरिकेच्या सुरक्षेला बांधा आणणाऱ्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानने कारवाई करावी,’ असे हॅरिस यांनी सांगितले.Hamla harris targets Pakistan
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॅरिस यांची भेट घेतली. कमला हॅरिस यांची उपाध्यक्षपदावर निवड झाल्यापासून त्यांची मोदींबरोबरील ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती. हॅरिस यांनी भारतातील लसीकरण मोहिमेचे कौतुक केले, तर मोदी यांनी कमला हॅरिस यांना भारतभेटीचे निमंत्रणही दिले.
या भेटीनंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत झालेल्या चर्चेची माहिती दिली. ‘भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार देश आहेत. आमची मूल्ये आणि धोरणे समान आहेत,’ असे मोदींनी यावेळी सांगितले.
जगासमोर अनेक आव्हाने असताना तुम्ही आणि अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे स्वीकारली आणि अत्यंत कमी कालावधीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर कामही केले, अशी कौतुकाची पावती मोदी यांनी हॅरिस यांना दिली.
मोदी आणि हॅरिस यांचे पर्यावरणाच्या मुद्द्यावरही एकमत झाले. अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचे मोदींनी हॅरिस यांना सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App