विशेष प्रतिनिधी
दिल्ली : भारता शेजारील राष्ट्र म्यानमारमध्ये सध्या परिस्थिती अतिशय गंभीर आहे. म्यानमारमध्ये सत्ता बदलामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेवर भारताने चिंता व्यक्त केली आहे. बुधवारी जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत म्यानमारमधील लोकांच्या मानवी हक्कांसाठी विशेष प्रतिनिधीशी संवाद साधताना भारताने म्हटले आहे की, ‘म्यानमारमधील घडामोडींचा इतर देशावर थेट परिणाम होऊ शकतो.’
Indian government expresses concern over continued instability in myanmar
विशेष निवेदक, टॉम अँड्र्यूज यांनी कौन्सिलला संबोधताना म्हटले की, म्यानमारमधील सत्ताबदलानंतर परिस्थिती बिकट झाली असून मानवी हक्कांचे उल्लंघन आणि चाललेली मृत्यू संख्या टाळण्यासाठी बदल करणे आवश्यक आहे.
म्यानमार मधील लष्कराने 1,100 पेक्षा जास्त लोकांची हत्या केली आहे. तर 8,000 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. आणि 230,000 हून अधिक नागरिकांना जबरदस्तीने विस्थापित केले आहे. जुलै पर्यंत लष्करी जंटाने 14 महिने ते 17 वर्षे वयोगटातील किमान 75 मुलांना ठार मारले होते.
Myanmar Military Coup : म्यानमारमध्ये सैन्याकडून अत्याचार सुरूच, गोळीबारात आणखी 38 आंदोलक ठार
म्यानमार मधील लोकांसाठी भारताने कोविड विरुद्ध लढण्यासाठी तातडीची वैद्यकीय मदत दिली आहे आणि ही मदत लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मानवाधिकारासाठी काम करणाऱ्या आशियाई केंद्राची मदत घेतली आहे. म्यानमारमधील राखीन राज्यासह आमचे विकासात्मक आणि मानवतावादी प्रयत्न देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाचे उद्दीष्ट आहेत, असे भारतीय प्रतिनिधी म्हणाले.
विस्थापित रोहिंग्या लोकांना राखीने राज्यात परत पाठवण्याच्या प्रयत्नांचा भारत बांगलादेशात सरकारला पूर्ण साहाय्य करेल असेही सांगितले आहे. विस्थापित व्यक्तींच्या सुरक्षित, जलद आणि शाश्वत मायदेशी परतण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांना गती देणे महत्वाचे आहे. भारत या संदर्भात बांगलादेश सरकारला पाठिंबा देत राहील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App