प्रतिनिधी
पारनेर – राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची एका पाठोपाठ एक भ्रष्टाचार प्रकरणे बाहेर काढणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात राष्ट्रवादीने कोल्हापूरात उपसलेली तलवार पारनेरमध्ये मात्र म्यान केली. ठाकरे – पवार दोन ठेकेदार; महाराष्ट्रात हाहाकार, असे वक्तव्य सोमय्यांनी येथे केले.NCP did not protest against kirit somaya in parner
किरीट सोमय्या यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील साखर कारखान्याला भेट दिली. या कारखान्याच्या विक्रीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार कारखाना बचाव समितीने त्यांच्याकडे केली होती. त्यानुसार सोमय्या पारनेरला आले होते. त्यांनी कारखान्याचे कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. पण राष्ट्रवादीच्या कोल्हापूरप्रमाणे राष्ट्रवादीकडून मात्र काहीही प्रतिक्रिया आली नाही.
राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप केल्याने किरीट सोमय्या येण्यापूर्वीच कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हातात कोल्हापूरी पायताणे घेऊन आंदोलन केले होते. त्यांना कोल्हापूर प्रवेशबंदी केली. यावरून मोठे नाट्य घड़ले होते. पण पारनेरमध्ये राष्ट्रवादीने किरीट सोमय्या यांच्या विरोधात कोणतेही आंदोलन केले नाही.
पारनेरमध्ये सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की मी जे काम करतो, त्याला आरोप म्हणून नका. मी तपास यंत्रणांना माहिती आणि पुरावे देऊन पाठपुरावा करीत असतो. पारनेर कारखान्याच्या विक्रीतही संशयास्पद व्यवहार झाला आहे. त्यामुळे त्यानुसार त्याची चौकशी सुरू आहे. आता त्याला गती आली आहे.
पूर्वी राष्ट्रवादीत असलेल्या आणि आता भाजपमध्ये आलेल्या काही नेत्यांच्या कारखान्याबद्दलही तक्रारी आहेत. त्यात लक्ष घालणार का? असे पत्रकारांनी विचारले असता सोमय्या म्हणाले, माझ्याकडे कोणी तक्रार घेऊन आले तर मी त्याची माहिती घेतो. अभ्यास करतो. अधिक माहिती आणि पुरावे संकलित करून त्याचा पाठपुरावा करतो. सामान्य माणसाच्या बाजूने मी नेहमी उभा राहतो.
पारनेर कारखान्याच्या बाबतीतही बचाव समिती मला येऊन भेटली. केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी लक्ष घालण्याची सूचना केली. त्यामुळे मी येथे आलो आहे. यामध्ये पक्षीय संबंध येत नाही. हे लोक आता माझ्याकडे आले. तुम्ही त्यावेळी का आला नाहीत, असे मी त्यांना म्हणू शकत नाही,’ असे सोमय्या म्हणाले. राज्य सहकारी बँक आणि साखर कारखान्यांची प्रकरणे सुरुवातीला उघडकीस आणणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नालाही सोमय्या यांनी सोयीस्कर बगल दिली.
कोल्हापूरमध्ये त्यांच्यावर झालेल्या कारवाईबद्दल पोलिस आणि राज्य सरकारवर त्यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले, कोल्हापूर पोलिसांनी जी वागणूक दिली, त्याबद्दल मी मुंबईतील पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहे. ते मला अंबाबाईचे दर्शन घेण्यापासून रोखत आहेत, त्यामुळे पुढील आठवड्यात मी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहे.
ठाकरे, पवार हे दोन ठेकेदार आणि त्यांचे शिष्य एकत्र झाल्याने महाराष्टात हाहाकार माजला आहे. सामान्य माणूस त्यांच्याविरोधात तक्रार करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र, मी कोणाला घाबरणार नाही. कितीही धमक्या आल्या, कितीही वेळा अटक झाली, तरी माझे काम सुरूच ठेवणार आहे’, असा इशाराही सोमय्या यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App