Girish Matrubhutam : बिझनेस सॉफ्टवेअर बनवणारी भारतीय कंपनी फ्रेशवर्क्सची अमेरिकन स्टॉक एक्स्चेंज नॅसडॅकवर शानदार लिस्टिंग झाली आहे. कंपनीने या लिस्टिंगमधून 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 7500 कोटी रुपये) गोळा केले आहेत, ज्यामुळे त्यांचे शेकडो कर्मचारी एका झटक्यात कोट्यधीश झाले आहेत. Know About girish matrubhutam and his company FreshWorks who creates 500 employees as millionaire
वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : बिझनेस सॉफ्टवेअर बनवणारी भारतीय कंपनी फ्रेशवर्क्सची अमेरिकन स्टॉक एक्स्चेंज नॅसडॅकवर शानदार लिस्टिंग झाली आहे. कंपनीने या लिस्टिंगमधून 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 7500 कोटी रुपये) गोळा केले आहेत, ज्यामुळे त्यांचे शेकडो कर्मचारी एका झटक्यात कोट्यधीश झाले आहेत.
फ्रेशवर्क्सचे संस्थापक गिरीश मातृभुतम यांनी ही कमाल केली आहे. गिरीश मातृभुतम हे रजनीकांत यांचे मोठे चाहते आहेत आणि त्यांना त्यांचा आदर्श मानतात.
तामिळनाडूतील त्रिची या छोट्या शहरात 700 चौरस फुटांच्या वेअरहाऊसपासून सुरू झालेल्या त्यांच्या कंपनीने आज अमेरिकन स्टॉक एक्स्चेंज नॅसडॅकमध्ये सूचीबद्ध करून तब्बल 1.3 अब्ज डॉलर्स उभारले आहेत. एवढेच नाही, तर कंपनीने 500 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोट्यधीश केले आहे. यातील सुमारे 70 कर्मचारी 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत आणि बरेच जण अलिकडच्या वर्षांत कॉलेज पूर्ण केल्यानंतर कंपनीत रुजू झाले होते.
कंपनीची कार्यालये चेन्नई आणि सॅन मातेओ, यूएसए येथे आहेत. ही एक सॉफ्ववेअर ऐज अ सर्व्हिस कंपनी आहे. या आयपीओमधून कंपनीने नॅस्डॅकवर एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम उभारली आहे.
कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश मातृभुतम आणि सुरुवातीचे गुंतवणूकदार Accel आणि Sequoia यांना IPO लिस्टिंगचा मोठा फायदा झाला आहे. यासह कंपनीचे शेकडो कर्मचारीदेखील कोट्यधीश झाले आहेत.
फ्रेशवर्क्स स्टॉकने बुधवारी नॅस्डॅकवर $ 43.5 प्रति शेअरवर व्यापार करण्यास सुरुवात केली, जी कंपनीच्या प्रति शेअर 36 डॉलरच्या लिस्टिंग किंमतीपेक्षा 21 टक्के जास्त होती. यामुळे कंपनीला 12.3 अब्ज डॉलरचे मार्केट कॅप मिळाले आहे.
कंपनीचे 76 टक्के कर्मचारी शेअर्सचे मालक आहेत. अनेक तरुण कर्मचाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी महाविद्यालयातून पदव्या घेतल्या होत्या आणि त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना कंपनीत शेअर्स मिळाले. फ्रेशवर्क्सने दोन वर्षापूर्वी सिकोइया कॅपिटल आणि एक्सेलसारख्या गुंतवणूकदारांकडून $ 3.5 अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनासाठी $154 दशलक्ष निधी गोळा केला होता. या अनोख्या यशामुळे कंपनी चर्चेत आली आहे.
Know About Girish Matrubhutam and his company FreshWorks who creates 500 employees as millionaire
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App