cm charanjit singh channi me too case : पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या बंडाळीदरम्यान पक्षाने नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा केली आहे. दलित नेते चरणजित सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री असतील. ते सोमवारी सकाळी 11 वाजता शपथ घेतील. काँग्रेसच्या या निर्णयावर भारतीय जनता पक्षाने प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणतात की #MeToo प्रकरणात चरणजीत सिंह चन्नींवर आरोप झालेले आहेत. bjp leader amit malviya lashesh out at rahul gandhi, tweet on new punjab cm charanjit singh channi me too case
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या बंडाळीदरम्यान पक्षाने नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा केली आहे. दलित नेते चरणजित सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री असतील. ते सोमवारी सकाळी 11 वाजता शपथ घेतील. काँग्रेसच्या या निर्णयावर भारतीय जनता पक्षाने प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणतात की #MeToo प्रकरणात चरणजीत सिंह चन्नींवर आरोप झालेले आहेत.
भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्वीट केले, “काँग्रेसने 3 वर्षे जुन्या MeToo प्रकरणात अडकलेल्या चरणजीत चन्नी यांना मुख्यमंत्रिपदासाठी निवडले. आरोप आहे की, त्यांनी 2018 मध्ये महिला आयएएस अधिकाऱ्याला आक्षेपार्ह संदेश पाठवले होते. प्रकरण दाबले गेले, पण जेव्हा पंजाब महिला आयोगाने नोटीस पाठवली, तेव्हा ही गंभीर बाब समोर आली. छान, राहुलजी.”
In the last few days, Congress in Rajasthan passed a bill to register child marriages, giving it legitimacy and robbing young girls of their growing up years, and now has elevated a #MeToo accused as CM of Punjab. Let’s wait for Rahul Gandhi to pontificate on women empowerment… — Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) September 19, 2021
In the last few days, Congress in Rajasthan passed a bill to register child marriages, giving it legitimacy and robbing young girls of their growing up years, and now has elevated a #MeToo accused as CM of Punjab.
Let’s wait for Rahul Gandhi to pontificate on women empowerment…
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) September 19, 2021
अमित मालवीय यांनी पुढे लिहिले की, गेल्या काही दिवसांत काँग्रेसने राजस्थानमध्ये एक विधेयक मंजूर केले जेथे बालविवाहाला मान्यता देण्यात आली आहे, आता पंजाबमध्ये MeToo च्या आरोपीला मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. यामुळे आता राहुल गांधी महिला सक्षमीकरणावर बोलण्याची वाट पाहूया !
या वर्षी मे महिन्यातच पंजाब महिला आयोगाने 3 वर्षे जुन्या प्रकरणाबाबत राज्य सरकारकडे तक्रार पाठवल्यानंतर चरणजीतसिंग चन्नी यांच्यावरील आरोप उघडकीस आला. आयोगाने तेव्हा एका आठवड्याच्या आत आपल्या तक्रारीवर उत्तर मागितले होते.
ऑक्टोबर 2018 मध्ये चरणजीत सिंह चन्नी यांनी कथितपणे एका महिला IAS अधिकाऱ्याला अभद्र संदेश पाठवला होता. त्या महिलेने त्याच्याविरोधात कधीही तक्रार दाखल केली नाही आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दावा केला होता की, हे प्रकरण त्यावेळी ‘मिटवले’ होते. ते म्हणाले की, चन्नी यांनी त्या महिलेची माफी मागितली आहे आणि हे प्रकरण मिटवले आहे.
चरणजीत सिंग चन्नी यांनी असा दावा केला होता की, त्यांनी चुकून आयएएस अधिकाऱ्याला तो संदेश पाठवला होता.
त्यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी सरकारने निर्धारित वेळेत प्रतिसाद दिला नाही तर त्या आणि संपूर्ण टीमसह उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. या प्रकरणाने तेव्हाही पंजाबचे राजकारण तापले होते. आता तर चन्नी स्वत: मुख्यमंत्री झाले आहेत. यामुळे विरोधकांनी काँग्रेस नेतृत्वावर टीकेची तोफ डागली आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या सुंदोपसुंदीमुळे पक्षाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रथम आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर काँग्रेसने रविवारी आमदारांची बैठक बोलावली आणि चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाचा निर्णय घेण्यात आला.
अंबिका सोनी, सुखजिंदर सिंह रंधावा किंवा सुनील जाखड मुख्यमंत्री होण्याचा अंदाज होता, पण काँग्रेस पक्षाने आपल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. चरणजित सिंग चन्नी पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री असतील.
bjp leader amit malviya lashesh out at rahul gandhi, tweet on new punjab cm charanjit singh channi me too case
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App