नवी दिल्ली – देशातील श्रीमंत देवस्थानांमध्ये गणना होणाऱ्या केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिराला देखील मोठी आर्थिक चणचण सहन करावी लागत आहे. खुद्द देवस्थान समितीनेच सर्वोच्च न्यायालयात तशी कबुली दिली आहे.Padmanabh Temple facing economic crisis
मंदिराचे व्यवस्थापन सध्या अत्यंत प्रतिकूल अशा स्थितीतून जात असून दानपेटीत जमा होणाऱ्या रकमेतून मंदिराचा दैनंदिन खर्च भागविणे देखील मुश्कीतल झाल्याचे या समितीने म्हटले आहे.दरमहा मंदिराच्या देखभालीवर १.२५ कोटी रुपयांचा खर्च होतो.
आता आमचे मासिक उत्पन्न अवघे ६० ते ७० लाखांवर आले असल्याने तुम्हीच आता याबाबत निश्चिवत असे दिशानिर्देश देणे गरजेचे असल्याचे समितीच्या वकिलांनी सांगितले.न्यायालयाच्या आदेशानुसारच विश्वंस्त मंडळाची (ट्रस्ट)ची स्थापना करण्यात आली असून त्यांनी त्यांच्या उत्पन्नातील वाटा मंदिराला देणे अपेक्षित आहे असेही त्यांनी न्यायालयास सांगितले.
ट्रस्टची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ म्हणाले की, राजघराण्यानेच ट्रस्टची स्थापना केली असून हा ट्रस्ट प्रशासनात कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. याचिकेमध्ये देखील तसा उल्लेख दिसत नाही. या खटल्यात ट्रस्ट केवळ न्यायालयीन मित्र असल्याचाही दावाही त्यांनी केला.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे. श्री पद्मनाभस्वामी मंदिर ट्रस्टने दाखल केलेल्या याचिकेत मागील वर्षी न्यायालयाने दिलेल्या २५ वर्षांच्या ऑडिटच्या आदेशांतून त्यांना वगळण्यात यावे अशी मागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App