वृत्तसंस्था
मुंबई : सप्टेंबरचे पहिले दोन आठवडे पावसाने बॅटिंग केली होती. परंतु रविवारनंतर (ता.१९) राज्यात काही ठिकाणी पुन्हा मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. Chance of heavy rain with thunderstorms; Rains will intensify in some parts of Maharashtra after Sunday
गेल्या दोन तीन दिवसांपासून काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून अधून मधून सरी कोसळत आहेत. श्रावण संपून भाद्रपद लागल्यावर पावसाचा जोर कमी जास्त होत राहतो. पण तो कधी वाढेल, हे सांगता येत नाही. परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारनंतर पावसाचा जोर राज्यात काही ठिकाणी वाढू शकणार आहे. राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात मारठवाड्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यानंतर चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर हळुहळू कमी झाला आहे. हवामान खात्याने नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी उर्वरित राज्यात मात्र कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. सोमवारी आणि मंगळवारी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्राला तडाखा बसणार ?
सोमवारी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला. तर मंगळवारी पालघर, अमरावती, अकोला, वर्धा आणि नागपूर या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. या दोन दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App