विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे तत्कालीन खाजगी सचिव आणि अपर जिल्हाधिकारी संजीव पलांडे यांचं निलंबन करण्यात आले आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी सुरु असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.Anil Deshmukh’s then private secretary Sanjeev Palande suspended, jailed in Rs 100 crore case
ईडीने त्यांना २६ जूनला अटक केल्यानंतर ६ जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत होते. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली. त्यांचा पोलीस कोठडीतील कालावधी ४८ तासांपेक्षा अधिक असल्याने २६ जूनपासून त्यांना निलंबित मानण्यात आले आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत ते निलंबित राहतील असेही स्पष्ट करण्यात आलं आहे.
निलंबनाच्या कालावधीत संजीव पलांडे यांनी खासगी नोकरी किंवा धंदा करू नये असे स्पष्ट सांगण्यात आलं आहे. तसे केल्यास निलंबन निर्वाह भत्ता गमविण्यास पात्र ठरतील असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर खासगी नोकरी किंवा धंदा करत नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल असे सांगण्यात आलं आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅन्टेलिया या घराजवळ एका गाडीत स्फोटके सापडल्यानंतर, मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी, ईडीने याप्रकरणी माजी पोलीस निरीक्षक सचिन वाझेचीदेखील चौकशी केली.
अनिल देशमुख यांनी पैशांचा गैरवापर केला, असा ईडीला संशय आहे. त्यातूनच ईडीने देशमुख यांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
मुंबईतील रेस्टॉरंट व बार मालकांकडून अनिल देशमुख यांना चार कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आणि ती त्यांच्या विविध संस्था व बनावट कंपन्यांमध्ये वळवण्यात आली, असा आरोप ईडीने केला आहे. देशमुख यांच्यासह पलांडे व शिंदे यांच्या निवासस्थानी छापे घातल्यानंतर ईडीच्या अधिकाºयांनी पलांडे व शिंदे यांना २६ जून रोजी अटक केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App