विशेष प्रतिनिधी
पुणे : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाविकास आघाडीतील रस्सीखेच अखेर थांबली आहे राज्य शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी राज्यसेवेतील तसेच आयपीएस अशा 90 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये अतिरिक्त अधीक्षक आणि अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सोबतच 92 सहाय्यक पोलिस आयुक्तांचा देखील बदल्या करण्यात आल्या आहेत.Transfers of senior police officers in the state from Home department
उपायुक्त गणेश शिंदे यांची मुंबईमधून पुणे रेल्वेचे अतिरिक्त अधीक्षक पदी नेमणूक करण्यात आली आहे. संदीप पाटोळे (पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज ते मुंबई), रोहिदास पवार (पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज ते पुणे शहर), विवेक पाटील (अतिरिक्त अधीक्षक पुणे ग्रामीण ते पुणे शहर), स्वप्ना गोरे (पुणे शहर ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर), कविता नेरकर (अतिरिक्त अधीक्षक रेल्वे ते आंबेजोगाई), मितेश घट्टे (पुणे शहर ते अतिरिक्त अधीक्षक पुणे ग्रामीण), कल्पना बारवकर (एसीबी नांदेड ते पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज),
नीना जैन (एसआरपीएफ ते उस्मानाबाद), श्रीकांत पाठक (एसआरपीएफ ते मुंबई), शशिकुमार मीना (मुंबई ते एसआरपीएफ), वसंत परदेशी (वाशिम ते एसआरपीएफ) एस. जी. दिवाण (सीआयडी ते कोल्हापूर एसआरपीएफ), पंकज देशमुख (पुणे ते सीआयडी), दिगंबर प्रधान (महामार्ग ते पीएमआरडीए), तुषार दोषी (पोलीस प्रशिक्षण केंद्र मुरुड ते एटीएस अधीक्षक पुणे), अशी बदली झालेल्या उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
यासोबतच सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र साळुंखे यांची सातारावरून पुणे शहर येथे बदली करण्यात आली आहे. नारायण शिरगावकर (पुणे ग्रामीण ते पुणे शहर), आरती बनसोडे (सीआयडी ते पुणे शहर), सुधाकरराव सुधाकर यादव (पुणे ते गुप्तवार्ता विभाग पुणे), मच्छिंद्र चव्हाण (पुणे शहर पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर), सई भोरे पाटील (पुणे ग्रामीण ते तुळजापूर), रमाकांत माने (अनुसूचित जमाती ते पुणे शहर),
क्मिणी गलांडे (कोकण ते पुणे शहर), सुभाष कांबळे (पोलीस अकादमी ते एसीपी कारागृह), संजय नाईक पाटील (पिंपरी चिंचवड ते अहमदनगर), परशुराम कार्यकर्ते (नागपूर ते पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज), विजय पळसुले (गुप्तवार्ता विभाग ते पुणे शहर), अनील लंभाते (पुणे ग्रामीण ते सोलापूर), गणेश इंगळे (कोल्हापूर ते पुणे ग्रामीण) आणि राजेंद्र पाटील (सीआयडी ते पुणे ग्रामीण) अशी बदली झालेल्या सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. यासोबतच 6 अतिरिक्त अधीक्षकांना अधीक्षकपदी पदोन्नतीने बदली देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App