विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या टीकेला भाजप नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जावेद अख्तर यांनी हिंमत असेल, तर अफगाणिस्तानात जाऊन तालिबानवर टीका करावी, असे आव्हान भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिले. BJP targets javed Akhtar on his remarks
राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेल्या संघाविरोधात असे बोलणे ही अख्तर यांची राष्ट्रहिताच्या विचाराविरोधी मुक्ताफळे आहेत, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
संघ आणि विश्व हिंदू परिषद तालिबानी मानसिकतेचे आहेत, अशी टीका गीतकार अख्तर यांनी केली होती. त्यांच्या विधानाच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जुहू येथील निवासस्थानासमोर निदर्शने केली. या वेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App