विशेष प्रतिनिधी
मुंबई – महाआघाडीत आता कॉंग्रेस व शिवसेना या पक्षात कलगीतुरा रंगला आहे. गेली सत्तर वर्षे वरच्या स्थानावर असलेला काँग्रेस आगामी काळात पुन्हा क्रमांक एकचा पक्ष होऊन तो सर्व पक्षांच्या वरचे स्थान मिळवेल, असे प्रत्युत्तर राज्य काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नसीम खान यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिले आहे.Nasim Khan targets MP sanjay Raut
खान म्हणाले, उद्धव ठाकरे हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यामुळेच मुख्यमंत्री झाले आहेत. किमान समान कार्यक्रमानुसार हे सरकार चालते आहे. आघाडी सरकारमध्ये कोणीही पक्ष वर नाही व कोणीही खाली नाही, सर्व पक्ष समान आहेत.
राज्यातील पक्ष कार्यकर्ते व नेते यांच्या इच्छेनुसार आम्ही पुढील निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत.किंबहुना आम्ही आमचा पक्ष वाढविण्यासाठीच ही पावले उचलीत आहोत. येणाऱ्या काळात काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष होईल व त्याचे स्थान सर्वांत वरचे असेल,
असेही खान म्हणाले.महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार असले तरीही हे ठाकरे सरकार असून, शिवसेनेचे स्थान सर्व पक्षांच्या वरचे आहे. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो, त्याचे सरकार ओळखले जाते, असे वक्तव्य राऊत यांनी पुणे जिल्ह्यात केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App