वृत्तसंस्था
नवी दिल्ली / रांची : एकीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीत बाबत केंद्रातल्या मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार उघडपणे तालिबानच्या समर्थनासाठी बाहेर पडलेले दिसत आहेत. American forces are committing atrocities in Afghanistan. They harass mothers, sisters & children. The fight is against it
काँग्रेस नेत्यांच्या दररोजच्या पत्रकार परिषदांमध्ये मोदी सरकारच्या तालिबान विषयक धोरणावर पक्षाचे प्रवक्ते आणि नेते प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दोन वेळा पत्रकार परिषदांमध्ये मोदी सरकारच्या अफगाणिस्तान धोरणावर टीकास्त्र सोडले आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द काँग्रेसमध्येच मात्र अफगाणिस्तान विषयक धोरणाबाबत कोणतीही स्पष्टता दिसत नाही. कारण काँग्रेसचे आमदार आपल्या वरिष्ठ नेत्यांना पेक्षा काहीतरी वेगळीच भूमिका घेताना दिसत आहेत.
Wherever British & American forces go, they commit atrocities on people. There must be peace in Afghanistan because US troops have left & British forces have been chased away… We don't have to do anything with what is happening in Afghanistan/Pakistan: Congress MLA Irfan Ansari pic.twitter.com/Ngyspe4fM8 — ANI (@ANI) September 3, 2021
Wherever British & American forces go, they commit atrocities on people. There must be peace in Afghanistan because US troops have left & British forces have been chased away… We don't have to do anything with what is happening in Afghanistan/Pakistan: Congress MLA Irfan Ansari pic.twitter.com/Ngyspe4fM8
— ANI (@ANI) September 3, 2021
झारखंड मधील काँग्रेस आमदार इरफान अन्सारी यांनी तर खुलेपणाने अफगाणिस्तानातल्या तालिबानी राजवटीचे समर्थन केले आहे. अफगाणिस्तानात अमेरिकन आणि ब्रिटिश फौजांनी महिला मुलांवर अत्याचार केले. आता ते निघून गेले आहेत. तालिबानी राजवटीत अफगाण जनता खुश आहे, असा दावा आमदार इरफान अन्सारी यांनी केला आहे. एवढेच नाही तर आपण तालिबानी राजवटीचा समर्थनच करतो कारण तालिबानी राजवट महिला मुलांवर अत्याचार करत नाही असा अफलातून दावाही ते करून बसले आहेत.
एकीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते अफगाणिस्तानच्या अफगाणिस्तानात तालीबानी राजवट आल्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. त्यावरून मोदी सरकारला कोसत आहेत, तर दुसरीकडे त्यांचा आमदार मात्र खुलेपणाने तालिबानचे समर्थन करून आपल्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या धोरणावर सवाल खडा करताना दिसतो आहे. यातून काँग्रेसमध्ये नुसती धोरण अस्पष्टताच नाही, तर त्या पक्षाचा दुटप्पीपणाही यातून जनतेसमोर आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App