वॉशिंग्टन – अफगाणिस्तानात हालचाली करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. भारताविरुद्ध पाकिस्तानलाला बळ देण्याचाही प्रयत्न ते करतील. त्यामुळे चीनकडे अमेरिकेने चौकस नजरेने लक्ष ठेवले पाहिजे असा इशारा अमेरिकेच्या माजी राजदूत निकी हॅले यांनी दिला आहे.Keep watch on chinas move
त्या म्हणाल्या, आपल्यासमोर एकूण बरीच आव्हाने आहेत. अशावेळी अमेरिकेने आपल्या मित्रांना भक्कम बनवावे, त्यांच्याबरोबरील संबंध बळकट करावेत, आपले लष्कर आधुनिक बनवावे. आपल्याविरुद्ध होणाऱ्या संभाव्य सायबर-गुन्हे आणि दहशतवादी कारवायांचा प्रतिकार करण्यासाठी आपण सज्ज व्हायला हवे.
अफगाणिस्तानमधील बागराम हवाई तळ बळकावण्याचा चीनचा डाव आहे. त्यामुळे चीनच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्याची गरज आहे.संयुक्त राष्ट्रांवरील (यूएन) अमेरिकेच्या राजदूत म्हणून त्यांनी काम केले आहे.
तालिबानने अफगाणिस्तानमधील सत्ता बळकावल्यामुळे आता चीनकडे तातडीने लक्ष द्यावे लागेल असे त्यांना वाटते. बागराम हवाई तळ सुमारे दोन दशके अमेरिकेच्या नियंत्रणात होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App