विशेष प्रतिनिधी
टोकियो : कोरोनाचं संकट पाहता कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन कर्मचाऱ्यांना दिला आहे. जपानच्या एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी अजब आदेश जारी केला आहे. जपानी ब्रोकरेज फर्म नोमुराने आपल्या कर्मचाऱ्यांना सिगारेट पिण्यावर बंधनं आणली आहेत. Caution: Smoking is now banned for employes doing work from home also
“तुम्ही ऑफिसमध्ये असा किंवा वर्क फ्रॉम होम करत असाल. कामाच्या वेळेत तुम्हाला सिगारेट पिता येणार नाही. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कंपनीने हा नियम बनवला आहे”, असं कंपनीने आपल्या आदेशात म्हटलं आहे.
कर्मचारीही कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी घरातून काम करण्याला पसंती देत आहे. रोज ऑफिसला टापटिप जाणारे कर्मचारी आता कम्फर्टेबल कपड्यात घरून काम करतात. तसेच घरात सहज वावरतानाही अडचण येत नाही. कंपनीचा हा नियम ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.
तर डिसेंबरपर्यं कंपनीने ऑफिसमधील स्मोकिंग रुम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांवर देखरेख कशी ठेवणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. यावर कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “हा नियम कंपनी आणि कर्मचारी यांच्यातील विश्वासावर आधारित असेल आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांना कोणताही दंड केला जाणार नाही.”, असं प्रवक्ते योसिटॅका ओत्सु यांनी सांगितलं.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत. जेणेकरून कामाचे योग्य वातावरण निर्माण होईल. कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहील आणि त्यांना धूम्रपानापासून मुक्तता मिळेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App