मुंबई : सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन चार दिवसांत राज्यात मान्सून दिमाखात आगमन करेल, अशी शक्यता आहे. Good news for Monsoon Rainfall in September 2021 – IMD.
राज्यात मान्सूननं निराशा केली आहे. अनेक जिल्ह्यांत अपेक्षित पाऊस कोसळला नाही. दीड महिन्यांपासून ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. दरम्यान कोल्हापूर सांगलीसह कोकणात अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण केली. कोकणाला अधिक फटका बसला आहे.
दुसरीकडे विदर्भ, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अपेक्षित पाऊस कोसळला नाही. दरम्यान गेल्या महिन्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यात मिळून सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण ऑगस्ट महिन्यात अनेक ठिकाणी मान्सूननं निराशा केली आहे.
या पार्श्ववभूमीवर समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
पुढील चार ते पाच दिवसात बंगालच्या उपसागरात कमी हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आली. राज्यात सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी मान्सूनची जोरदार हजेरी लावणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App