विशेष प्रतिनिधी
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबतच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांची कडेकोट सुरक्षा करण्यात आली आहे.सामना कार्यालयाला तर छावणीचे स्वरूप आले आहे.,,MP Sanjay Raut under tight security, increased security, ma
राणे-शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. संजय राऊत यांच्या घर आणि सामनाच्या कार्यालयाला छावणीचं स्वरूप आलं आहे.भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
संजय राऊत यांच्याकडे सध्या वाय दर्जाची सुरक्षा आहे. राऊत यांच्या या ताफ्यात सध्या ६ शस्त्रधारी SPU जवानांचा ताफा आहे. मात्र, आता त्यांच्या ताफ्यात २ अतिरिक्त SPU चे जवान देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी भाजपा नेते नितेश राणे आणि निलेश राणे यांनी संजय राऊत यांना एक इशारा दिला होता. संजय राऊत जिथे दिसतील तिथे करेक्ट कार्यक्रम करू, असा या दोघांनीही सांगितलं होतं. त्यानंतरच आता राऊत यांच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App