विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : तालिबान्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर हजारो अफगाणी देश सोडून पळून जात आहे. तरीही पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार शाहीद आफ्रिदी याने तालीबान्यांचे कौतुक केले आहे. यामुळे सोशल मीडियावर शाहीद आफ्रिदीवर प्रचंड टीका होत आहे.Anger against Shahid Afridi who praised the Taliban
आफ्रिदीने माध्यमांशी संवाद साधताना तालिबानच्या सत्तेत परत येण्याचे समर्थन केले. आफ्रिदी म्हणाला की, तालिबान यावेळी खूप सकारात्मक विचारातून पुढे आला आहे. ते महिलांना अनेक क्षेत्रात काम करण्यास परवानगी देत आहे. यामध्ये राजकारणाचाही समावेश आहे.
मात्र, प्रत्यक्षात अफगणिस्थानातील परिस्थिती वेगळी आहे. हजारो अफगाणी नागरिक तालीबान्यांच्या जुलुमामुळे पळून जात आहेत. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होऊ लागली आहे. ऐवढेच नव्हे तर आपण पाकिस्तान सुपर लीगमध्ये यावेळी अखेरचे खेळणार आहोत.
कदाचित पुढील पीएसएलमध्ये क्वेट्टा ग्लॅडिएटर्सकडून खेळायला आवडेल असेही त्याने सांगितले.आफ्रिदीचे धक्कादायक वक्तव्य व्हायरल झाल्याने जगभरतून त्याच्यावर टीका होत आहे. अनेकांनी त्याचे जुने व्हिडिओही शेअर केले ज्यात तो क्रिकेट खेळणाºया महिलांविषयी अपमानास्पद बोलला आहे.
आफ्रिदी म्हणाला की, त्यांना वाटते की तालिबानला क्रिकेट आवडते. ते या खेळाला देशात प्रोहात्सान देतील. मात्र, ज्या पद्धतीने तालिबान्यांनी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डावर कब्जा केला आहे. यामुळे अनेक क्रिकेटपटू घाबरले असून देशातील क्रिकेट खूप अडचणीत येऊ शकते असे वाटते.
कारण यापूर्वी राशिद खान, मोहम्मद नबी सारख्या क्रिकेटपटूंनी त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.शाहिद आफ्रिदीने काश्मीरबाबत अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. या संवादात त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत काश्मीरमध्ये धार्मिक रेषेवर भेदभाव करत असल्याचा आरोप आफ्रिदीने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App