विशेष प्रतिनिधी
काबूल – अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहा बालकांचाही समावेश आहे. या कुटुंबाच्या घराजवळ लावलेल्या मोटारीवर बाँब आदळल्याने मोठा स्फोट झाला होता. USA drone attack killed 10 innocent peoples
अमेरिकेने ‘इसिस’शी संबंधित एका व्यक्तीला घेऊन जाणाऱ्या वाहनाला ड्रोनद्वारे लक्ष्य केले होते. या हल्ल्यादरम्यान त्या वाहनाच्या परिसरात असलेल्या व्यक्तींवरही बाँब पडले असण्याची शक्यता आहे, असे अमेरिकी लष्कराच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले.
ड्रोन हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी काही जणांनी आंतरराष्ट्रीय संघटनांबरोबर आधी काम केले होते आणि अमेरिकेला जाण्यासाठी त्यांना व्हिसाही मिळाला होता. लक्ष्य केलेल्या वाहनामध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोटके असल्याने, त्यांचा स्फोट होऊन इतर निरपराध लोकांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिकी लष्कराने, विमानतळाच्या दिशेने येणाऱ्या आत्मघाती हल्लेखोराला ठार मारल्याचे जाहीर केले होते. गेल्या आठवड्यात विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर अमेरिका अत्यंत सावध झाली आहे. सैन्यमाघारी होण्यापूर्वी आणखी काही हल्ले होण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान काबूल विमानतळाच्या दिशेने येणारे अनेक रॉकेट क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेद्वारे हवेतच नष्ट करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने आज केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App