विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कोरोनाचे आणखी काही संसर्गजन्य व्हेरिएंट सप्टेंबर अखेरपर्यंत तयार झाले तर ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते पण तिची तीव्रता ही दुसऱ्या लाटेपेक्षा कमी असेल असा अंदाज संशोधकांनी गणितीय आराखड्याच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. Third wave will not o dangerous
तिसऱ्या लाटेची तीव्रता ही दुसरीपेक्षा एक चतुर्थांशच असण्याची शक्यता आहे. याआधीही याच संशोधकांनी व्यक्त केलेल्या अंदाजामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये संसर्ग सर्वोच्च पातळी गाठण्याची शक्यता वर्तविली होती. आता ताज्या अंदाजामध्ये तिसरी लाट ही तुलनेने कमी तीव्र असू शकते असे भाकीत वर्तविण्यात आले आहे.
आयआयटी कानपूरमधील संशोधकांच्या तीन सदस्यीय पथकाने हे संशोधन केले आहे. तिसऱ्या लाटेदरम्यान देशभरात दररोज एक लाख रुग्ण सापडू शकतात, दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण दररोज चार लाखांपेक्षाही अधिक होते त्यामुळे मे महिन्यात या लाटेने हजारो लोकांचा बळी घेतल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App