विशेष प्रतिनिधी
ठाणे : अनधिकृत फेरिवाल्यांनी कारवाई दरम्यान ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत फेरिवाल्यांनी कारवाई दरम्यान हल्ला केला. या हल्यात कल्पिता पिंपळे यांच्या हाताची बोटे कापली गेली आहेत.The hawkers attacked the female assistant commissioner who went for encroachment action in Thane.
कासावडवली भागातील मार्केट परिसरात अनाधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या माजिवडा मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकू हल्ला केला. या घटनेत त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली आहेत. त्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या अंगरक्षकावर देखील हल्ला झाला असून त्याचे देखील एक बोट कापले गेल्याची माहिती समोर आली आहे.
त्यांच्यावर आता येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ला करणाºया फेरीवाल्याला कासारवडवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील अनाधिकृत बांधकामांपाठोपाठ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
सोमवारी अशाच प्रकारे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांच्या पथकाने घोडबंदर भागातील कासारवडवली येथील मुख्य मार्केटमध्ये पदपथ आणि रस्ते अडविणाºया फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. सांयकाळी ६.३० च्या सुमारास ही कारवाई सुरु होती.
त्याच वेळेस एका फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पथक पुढे सरसावत असतांनाच संतप्त झालेल्या फेरीवाल्याने रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकू हल्ला केला. फेरीवाल्याने त्यांच्या डोक्यावर चाकू भिरकवला असता, त्याच वेळेस हल्यापासून बचाव करण्यासाठी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवला, त्यात हा हल्ला त्यांच्या हातावर झाला.
त्यामध्ये त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे कापली गेली. ती तुटुन खाली पडली. या हल्याचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावलेल्या त्यांच्या अंगरक्षकाच्याही डाव्या हाताचे एक बोट कापले गेले. तर यावेळी येथील स्थानिक नागरीक आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्या फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला.
परंतु पोलीस आपल्याला पकडण्यासाठी पुढे येत असल्याचे समजताच त्याने तोच चाकू आपल्या गळ्यावर ठेवून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर अमरजीत यादव या फेरीवाल्याला मोठ्या शिताफीने पकडून कासारवडली पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App