
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर, पूर्व वा असो दक्षिण काँग्रेस सर्वत्र बंडाच्या अडचणीत…!!, अशी स्थिती काँग्रेस पक्षाची झाली आहे. उत्तरेत पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांचे वाद आता पक्षाचे केंद्रीय प्रभारी हरीश रावत यांच्यावर थेट आरोप करण्यापर्यंत येऊन ठेपले आहेत. Kerala Congress Secy PS Prasanth writes to Congress leader Rahul Gandhi, against AICC Gen Secy KC Venugopal.
पश्चिम बंगाल आणि आसाम या पूर्वेकडील राज्यात काँग्रेस पक्ष फुटून उरलासुरला ही संपतो आहे. काँग्रेसचे मोठे नेते एकापाठोपाठ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस मध्ये जाऊन पोहोचत आहेत.
His letter further reads, "Congress workers in Kerala are doubtful whether his actions to collapse the party are in accordance with the collusion he made with BJP."
— ANI (@ANI) August 30, 2021
त्यातच दक्षिणेतील राज्य केरळची भर पडली आहे. केरळमध्ये पलक्कड जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष, ज्येष्ठ नेते गोपीनाथम यांनी पक्षातल्या गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला आहे, तर पक्षाचे केरळचे प्रदेश चिटणीस पी. एस. प्रशांत यांनी काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या विरोधात तक्रार करणारे पत्र खासदार राहुल गांधी यांना पाठवले आहे. वेणुगोपाल यांनी पक्षाच्या संघटनेची सूत्रे हाती घेतल्यानंतर गोवा, कर्नाटक, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब या राज्यांमध्ये काँग्रेस संघटना ढासळली, असा आरोप प्रशांत यांनी या पत्रात केला आहे.
वास्तविक के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे पक्षाचे संघटन सरचिटणीसपद आहे. वेगवेगळ्या प्रदेशांमधील संघटनात्मक निर्णय घेण्याची आणि वाद सोडवण्याची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि मंत्री टी. एस. सिंगदेव यांच्यातील वाद सोडविण्यासाठी दोन्ही नेते वेणुगोपाल यांनाच भेटले होते.
परंतु, आता दस्तुरखुद्द वेणुगोपाल यांच्या विरोधातच केरळमधल्या प्रदेश चिटणीस प्रशांत यांनी थेट राहुल गांधींकडे तक्रार केल्यामुळे काँग्रेस संघटनेची अवस्था किती बिकट आहे हे स्पष्ट होते आहे.
Kerala Congress Secy PS Prasanth writes to Congress leader Rahul Gandhi, against AICC Gen Secy KC Venugopal.
महत्त्वाच्या बातम्या
- मारुती सुझुकीच्या कार सप्टेंबरपासून महागणार, वर्षातील सलग तिसरी वाढ; अनेक पार्टच्या किमती वाढल्याने घेतला निर्णय
- हरियाणात सक्तीने धर्मांतराच्या घटना समोर; धर्मांतरविरोधी कायदा आणणार; मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची घोषणा
- 72 कोटींच्या घोटाळ्यात वाशीममध्ये शिवसेना खासदार भावना गवळींच्या शिक्षण संस्थांवर 9 ठिकाणी ED चे छापेमारी
- WATCH : पिंपरी-चिंचवडच्या सोसायटीत ४० जणांना कोरोनाची लागण पिंपरी-चिंचवडकरांना कोरोना संक्रमणाची धास्ती