प्रतिनिधी
मुंबई – भाविना पटेलने राष्ट्रीय क्रीडा दिनी टोकिया पॅराऑलिंपिकमध्ये टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक जिंकताच सोशल मीडियावर खेळांसंबंधींच्या बातम्या, सर्च, आणि ट्विट्स यांचा जोरदार सिलसिला सुरू झाला आहे. NationalSportsDay BhavinaPatel Paralympics MajorDhyanChand tops on social media trends
ट्विटरवर सध्या टॉप १० मध्ये पहिले ७ ट्विट तर फक्त खेळासंबंधीच आहेत. त्याच प्रमाणे गुगलवर देखील हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सर्वांत आघाडीवर आहेत. त्यातही त्यांचे हिटरलबरोबरचे फोटो सोशल मीडियावर झळकत आहेत.
१९३६ च्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये हिटलरच्या उपस्थितीत हॉकीच्या अंतिम सामन्यात भारताने जर्मनीचा ८ – ० ने पराभव करून सुवर्ण पदक जिंकले होते. याच्या स्टोरीज ट्विटर, फेसबुक, गुगल या सोशल मीडियावर भरपूर ट्रेंड होताना दिसत आहेत.
भाविना पटेलला आज टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तरी देखील तिने टेबल टेनिसमधले भारताला पहिले पदक मिळवून दिले. तिच्यावर राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून सर्वांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तिच्या नावाचे सर्च देखील गुगलवर सुरू आहेत.
आपण आपला गेम प्लॅन नीट अमलात आणू शकलो नाही, असे भाविना पटेलने रौप्य पदक जिंकल्यावर पत्रकारांना सांगितले. आपले रौप्य पदक तिने देशाला समर्पित केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App