Bengal Post Poll Violence : विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान महिलांविरुद्ध अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणांच्या तपासादरम्यान आज आणखी 10 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. Bengal Post Poll Violence CBI probe into West Bengal, 21 cases registered
वृत्तसंस्था
कोलकाता : विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान महिलांविरुद्ध अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणांच्या तपासादरम्यान आज आणखी 10 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. नादिया जिल्ह्यातील छपरा पोलीस स्टेशन परिसरात एफआयआर नोंदवण्यात आला आहे यात 3 लोकांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती. सीबीआयने याप्रकरणी 2 जणांना ताब्यातही घेतले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात आतापर्यंत एकूण 21 गुन्हे दाखल झाले आहेत. सीबीआयने सहसंचालकांच्या नेतृत्वाखाली चार पथके स्थापन केली आहेत आणि ही टीम हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांना भेट देत आहे. शुक्रवारपर्यंत याप्रकरणी 11 गुन्हे दाखल झाले होते.
सूत्रांनी सांगितले की, संपूर्ण तपास अतिरिक्त संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली केला जात आहे. प्रत्येक पथकात सात सदस्य आहेत. यामध्ये एक उपमहानिरीक्षक आणि तीन पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील मतदानोत्तर हिंसाचारादरम्यान महिलांवरील कथित गुन्हे आणि हत्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर सीबीआयने तपास सुरू केला आहे.
सीबीआय अधिकारी अखिलेश सिंग यांच्या देखरेखीखाली तपास केला जात आहे. सीबीआयने मतदानोत्तर हिंसा प्रकरणाचा तपास कोळसा आणि पशु तस्करी अधिकारी अखिलेश सिंग यांच्याकडे सोपवला आहे. अखिलेश सिंग आता विशेष गुन्हे शाखेची अतिरिक्त जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना विशेष गुन्हे शाखेचे प्रमुख बनवण्यात आले आहे. ते खून आणि बलात्कार प्रकरणांचा तपास करतील.
मतदानानंतरच्या हिंसाचाराच्या संदर्भात एकूण 64 सीबीआय तपास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता पथकातील सदस्यांची संख्या 109 झाली आहे.
कोलकात्याला पोहोचल्यानंतर सीबीआय टीम मृत भाजप कार्यकर्ता अभिजित सरकारच्या कुटुंबाला भेटली. त्याच्या कुटुंबीयांनी अभिजीतच्या हत्येचा आरोप केला होता. त्या प्रकरणातही सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतर कथित हिंसाचाराच्या घटनांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकांवर एकसंध निर्णय देताना पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने इतर सर्व प्रकरणांच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ स्थापन करण्याचे आदेशही दिले होते. त्या बाबतीतही प्रक्रिया सुरू झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या प्राथमिक तपासानंतर सीबीआयने बंगाल हिंसाचाराबाबत स्थापन केलेल्या विशेष गुन्हे युनिटला संशय आहे की, दोन डझनहून अधिक घटना घडल्या आहेत, ज्यात फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जाईल. यासह सीबीआय तपासादरम्यान केस डायरीचा तपशील घेऊन बंगाल पोलिसांचे जबाबदेखील नोंदवणार आहे. आवश्यकता भासल्यास ते 164 सीआरपीसी अंतर्गत प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवणार आहेत.
Bengal Post Poll Violence CBI probe into West Bengal, 21 cases registered
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App