सावध ऐका पुढल्या हाका : नरिमन पॉइंटसह 80 टक्के दक्षिण मुंबई 2050 पर्यंत पाण्याखाली जाणार, BMC आयुक्त चहल यांचे भाकीत

bmc commissioner Iqbal Singh Chahal Says 80 percent of south mumbai including nariman point will be under water by 205

bmc commissioner Iqbal Singh Chahal : बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई शहराबद्दल अत्यंत भयंकर भविष्यवाणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 2050 पर्यंत नरिमन पॉइंट आणि राज्य सचिवालय ‘मंत्रालय’ यासह दक्षिण मुंबईचा मोठा भाग समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे पाण्याखाली जाईल. ते म्हणाले की, निसर्ग इशारा देत ​​आहे, परंतु जर लोक जागे झाले नाहीत, तर येत्या काळात येथील परिस्थिती ‘धोकादायक’ होईल. bmc commissioner Iqbal Singh Chahal Says 80 percent of south mumbai including nariman point will be under water by 205


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई शहराबद्दल अत्यंत भयंकर भविष्यवाणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 2050 पर्यंत नरिमन पॉइंट आणि राज्य सचिवालय ‘मंत्रालय’ यासह दक्षिण मुंबईचा मोठा भाग समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे पाण्याखाली जाईल. ते म्हणाले की, निसर्ग इशारा देत ​​आहे, परंतु जर लोक जागे झाले नाहीत, तर येत्या काळात येथील परिस्थिती ‘धोकादायक’ होईल.

इक्बाल सिंह चहल यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मुंबई हवामान कृती आराखडा आणि त्याच्या वेबसाइटच्या उद्घाटन समारंभात हे भाकीत केले आहे. चहल म्हणाले की, शहराच्या दक्षिण मुंबईतील A, B, C आणि D वॉर्डाचा 70 टक्के भाग हवामान बदलामुळे पाण्याखाली जाणार आहेत. ते म्हणाले, “कफ परेड, नरिमन पॉइंट आणि मंत्रालय यासारखे ऐंशी टक्के क्षेत्र पाण्याखाली जाणार आहे. ही फक्त 25-30 वर्षांची गोष्ट आहे, कारण 2050 दूर नाही.”

वेळीच काळजी घेण्याची गरज – बीएमसी आयुक्त

बीएमसी आयुक्त चहल यांनी इशारा दिला, “आपल्याला निसर्गाकडून इशारे मिळत आहेत आणि जर आपण वेळीच जागे झालो नाही तर पुढील 25 वर्षांत परिस्थिती भयंकर असेल. याचा परिणाम फक्त पुढच्या पिढीवरच नाही तर सध्याच्या पिढीवरही होईल.” ते म्हणाले की, मुंबई हे दक्षिण आशियातील पहिले शहर आहे जे आपल्या हवामान कृती आराखड्याची तयारी आणि काम करत आहे.

चहल म्हणाले की, गेल्या वर्षी, 129 वर्षांत प्रथमच निसर्ग वादळाने मुंबईला धडक दिली आणि त्यानंतर गेल्या 15 महिन्यांत तीन चक्रीवादळे आली. 5 ऑगस्ट 2020 रोजी नरिमन पॉइंटवर सुमारे 5 ते 5.5 फूट पाणी जमा झाले. ते म्हणाले, “त्या दिवशी चक्रीवादळाचा इशारा नव्हता, परंतु मापदंड पाहता, हे चक्रीवादळ होते.”

अलीकडच्या काळात शहराला काही अत्यंत प्रतिकूल हवामान परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यावर जोर देताना ते म्हणाले की, मुंबईला चक्रीवादळ तोक्तेचा सामना करावा लागला. येथे 17 मे रोजी 214 मिमी पाऊस पडला, खरेतर येथे मान्सून सहा किंवा सात जून रोजी येत असतो. बीएमसीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅन (एमसीएपी) अंतर्गत, आकडेवारीच्या मूल्यमापनाने वाढत्या हवामानातील अनिश्चिततेमुळे सर्वात असुरक्षित क्षेत्रांची ओळख करण्यात आली आहे.

bmc commissioner Iqbal Singh Chahal Says 80 percent of south mumbai including nariman point will be under water by 205

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था