प्रतिनिधी
मुंबई : आक्रमणकारी बाबराचे गुणगाण करणारी कुणार कपूरची वेब सीरिज ‘द एम्पायर’ नुकतीच हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. ही वेब सीरिज एका शूरवीर योद्धयावर आधारित असल्याचा दावा करण्यात येत आहे आहे. यात कुणाल कपूर एका योद्धाची भूमिका साकारत आहे. पण प्रदर्शित झाल्यानंतर ही वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सोशल मीडियावर लोक या वेब सीरिजचा विरोध करत आहेत आणि सीरिजवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. यानंतर #UninstallHotstar हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. UninstallHotstar trends on Twitter against web series The empire
‘द एम्पायर’ ही वेब सीरिज मुघल आक्रमक बाबरच्या आयुष्यावर आधारीत आहे. ही सीरिज पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठविली आहे. या सीरिजमध्ये मुघल शासक बाबरचा गौरव करण्यात आला आहे. लाखो हिंदूंचा हत्यारा बाबरविषयी निवडक चांगल्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.
सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर ट्विटरवर नेटिझन्सनी ट्विट करत विरोध व्यक्त केला आहे. ‘बाबरला हिंदू आणि शीखांना मारायचे होते. त्याने राम मंदिर उद्ध्वस्त केले आणि त्यावर बाबरी मशीद बांधली. हॉटस्टार अॅपवर ‘द एम्पायर’ सीरिजमध्ये यातून बाबरा चा गुणगौरव करीत आहे. हे अॅप अप्रत्यक्षपणे मुघलांचे समर्थन करत आहे.
‘हॉटस्टारने बाबरवरील त्यांच्या सीरिजवरील तक्रारी नाकारल्या, त्यांनी दावा केला आहे की ते इस्लामिक आक्रमणकर्त्याचा गौरव करत नाही. मी अनइनस्टॉल केले आहे. तुम्ही केले का?’ त्यामुळे नेटिझन्सनी अनइन्स्टॉल हॉटस्टार हँशटँग ट्रेंड केला आहे.
‘बाबरच्या वंशजांनी केवळ भारताला लूटले नाही, त्यांनी हिंदू मंदिरे नष्ट केली आणि हिंदूंची हत्या केली.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘हॉटस्टार मुघल साम्राज्याला पाठिंबा देत आहे. बाबर एवढा महान होता का?’ जो माझ्या प्रभू श्रीरामांचा नाही, तो माझ्या काही कामाचा नाही, हॉटस्टार अनइनस्टॉल,’ अशा अनेक कमेंट करत नेटिझन्सनी हॉटस्टारला ट्रोल केले आहे.
या वेब सीरिजचे दिग्दर्शन मिताक्षरा कुमार यांनी केले आहे. या सीरिजचे निर्माता निखिल अडवाणी आहेत. या सीरिजमध्ये कुणाल कपूर, डिनो मोरिया आणि शबाना आजमी या मुख्य भूमिकेत दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App