विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये सत्ताधारी काँग्रेसपुढे मोठा राजकीय पेचप्रसंग उभा ठाकला आहे. विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची मुख्यमंत्रिपदाची अडीच वर्षे पूर्ण झाल्यामुळे आपल्याला हे पद मिळावे अशी भूमिका त्रिभुवनेश्वर शरण सिंह देव यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या आमदारांना शुक्रवारी सकाळपर्यंत दिल्लीत दाखल होण्याचा आदेश देण्यात आला आहे. Big jolt to Bghel govt. in Chattisghdh
बघेल आणि देव या दोघांनी आठवड्याच्या प्रारंभी पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. बघेल यांना एक प्रकारे नोटीस बजावण्यात आल्याची चर्चा असून पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे पालन करू अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे समजते.
पक्षाच्या आमदारांना दिल्लीत पाचारण करण्यात आल्यामुळे राज्यात नेतृत्वाचा पेच गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. बघेल शुक्रवारी पुन्हा राहुल यांना भेटणार आहेत. दुसरीकडे देव हे आधीच्या बैठकीनंतर छत्तीसगडला परतलेलेच नाहीत असे समजते.
छत्तीसगडमध्ये काँग्रेसला विजयानंतरच पेचाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी देव यांच्याशिवाय ताम्रध्वज साहू यांनी नेतृत्वावर हक्क सांगितला होता. अखेर त्या दोघांना मंत्री बनविण्यात आले आणि बघेल यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यांनी डिसेंबर २०१८ मध्ये हे पद स्वीकारले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App