
विशेष प्रतिनिधी
सांगली : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या ज्येष्ठ संशोधक -लेखिका गेल ऑम्व्हेट यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर यांच्या त्या पत्नी होत.Senior researcher, author Dr. Gail Omvet passed away
बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी त्यांनी केली होती.डॉ. गेल मूळच्या जन्माने अमेरिकेच्या असल्या तरी त्या तेथे विद्यार्थी दशेपासूनच वेगवेगळ्या चळवळीमध्ये सक्रिय होत्या.
अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीविरोधी उभा राहिलेल्या तरुणाईच्या चळवळीत त्या अग्रस्थानी होत्या. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या भारतात आल्या. वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रात आल्या.
महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी वसाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड हा आपला पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बरकली विद्यापीठात सादर करून त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली या पुस्तकामुळेच प्रभावित होऊन बहुजन समाज पार्टीचे संस्थापक दिवंगत कांशीराम कासेगाव येथे येऊन त्यांचे मार्गदर्शन व सल्ला घेत असत.
स्री-मुक्ती चळवळींचा अभ्यास करत असतानाच क्रांतीविरांगना इंदूताई पाटणकर यांची भेट झाली. एमडीचे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ चळवळीत काम करण्याचा निर्णय घेतलेल्या डॉ. भारत पाटणकर यांना त्यांनीआपला जीवनसाथी म्हणून निवडले.
Senior researcher, author Dr. Gail Omvet passed away
महत्त्वाच्या बातम्या
- योगीजी माझ्या ज्येष्ठ बंधूंसारखे वागले; कल्याण सिंह यांचे पुत्र राजवीर सिंह यांची कृतज्ञ भावना
- शिवसेना आमदार संतोष बांगर यांची नारायण राणेंचा कोथळा बाहेर काढण्याची उन्मत्त भाषा
- छगन भुजबळ आणि दोन पुत्रांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून जप्त; किरीट सोमय्या यांचा दावा
- अफगाणिस्तानातून आणलेल्या 78 अफगाणांपैकी 16 संक्रमित, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या आले होते संपर्कात
- नारायण राणेंना जामीन मिळाला तरी त्यांना कायद्याच्या जंजाळात अडकविण्याचा प्रयत्न; २ सप्टेंबरला हजर राहण्याची नाशिक पोलीसांची नोटीस