वृत्तसंस्था
बीजिंग : अफगाणिस्तानची सूत्रे आपल्या हातात घेतलेल्या तालिबानी सत्तेला आंतरराष्ट्रीय पातळीवरून मान्यता मिळवून देण्यासाठी चीन आणि पाकिस्तान संयुक्तपणे प्रयत्न करत आहेत. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी मात्र त्यांना दीर्घकालिन धोक्यांची जाणीव करून दिली आहे. China, Pakistan backs Talban
तालिबानने १५ ऑगस्टला काबूलचा ताबा मिळविल्यापासून अमेरिकेचा पराभव झाल्याच्या भावनेने आनंदून जात चीन आणि पाकिस्तानने अनेक पातळ्यांवर चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, तालिबानबरोबरच अल कायदा आणि इसिस या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी अफगाणिस्तानात मुक्तपणे फिरत असल्याने दहशतवाद फोफावण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
काबूल तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर काही तासांमध्येच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, ‘अफगाण नागरिकांनी पाश्चिेमात्यांच्या गुलामगिरीचे जोखड फेकून दिले,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’नुसार, अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्यास तालिबानला भाग पाडण्याच्या नावाखाली, त्यांच्याशी आंतरराष्ट्रीय पातळीवरून राजनैतिक चर्चा करण्यासाठी पाकिस्तान अनेक देशांशी, विशेषत: चीन आणि रशियाशी संवाद साधत आहे. चिनी माध्यमांमध्येही अमेरिकेच्या पराभवाची सखोल चर्चा केली जात आहे. सैन्यमाघारीच्या निर्णयामागे अमेरिकेला काही तरी फायदा दिसत असल्याशिवाय ते असा निर्णय घेणार नाहीत. ते चीन आणि रशियाविरोधात अधिक आक्रमक होऊ शकतात. बायडेन यांनीही गेल्या आठवड्यात तसाच इशारा दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App