विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग नाही आणि पाकिस्तानची सतत स्तुती करणारे लोक पंजाब काँग्रेसमध्ये असावे का, अशा शब्दांत घरचा आहेर काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनीष तिवारी यांनी दिला आहे. आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचा सल्लाही त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे.Should culinary people be in Punjab Congress? Manish Tiwari’s Navjyot Singh Sidhu
तिवारी म्हणाले, असे उथळ वक्तव्ये करणारे लोक देशासाठी रक्त सांडविणाºयांचा अपमान करीत आहेत. काँग्रेस पक्षातील जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग नसल्याचे मानणारे आणि पाकिस्तानकडे कल असणाऱ्यांबाबत आता विचार करावा, अशी विनंती मी पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांना करीत आहे.
पंजाबमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या दोन सल्लागारांनी काश्मीर आणि पाकिस्तानसारख्या संवेनदशील विषयावर केलेल्या उथळ वक्तव्यांवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी टीका केल्यानंतर दुसऱ्यां दिवशी मनीष तिवारी यांनी काँग्रेसश्रेष्ठींना घरचा अहेर दिला आहे.
सिद्धू यांचे सल्लागार मालिवंदरसिंग माली आणि प्यारेलाल गर्ग यांनी केलेली वक्तव्ये शांतता तसेच देश आणि राज्याच्या स्थैयार्साठी अत्यंत घातक असल्याचे अमरिंदरसिंग यांनी स्पष्ट केले होते. आपल्या सल्लागारांना नियंत्रणात ठेवा, असा सल्ला त्यांनी सिद्धू यांना दिला होता. ज्या गोष्टींची माहिती नाही आणि ज्याच्या परिणामांबाबत माहिती नाही, त्याबाबत वक्तव्ये करू नका, असे त्यांनी सांगितले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App