वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील अन्य एक शीख महिला खासदार अनारकली कौर होनारयार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अफगाण निर्वासितांना केलेल्या मदतीबद्दल आभार मानले आहेत. Indian govt, PM Narendra Modi, MEA, & Indian Air Force. The situation in Afghanistan is unimaginable. There is no government.
अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीने कब्जा केल्यानंतर खासदार अनारकली कौर होनारयार या भारतात आलेल्या आहेत. अफगाणिस्तान मधील भयानक परिस्थिती त्यांनी पत्रकारांना सांगितले. अनेक अफगाण लोकांकडे प्रवासाची डॉक्युमेंट्स नाहीत. मध्यरात्री बारा वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत मोठ्या थंडीत आणि उन्हात सर्वांना वाट पाहावी लागत आहे. काबूलच्या विमानतळाभोवती दररोज गोळीबाराचे आवाज ऐकू येतात. तालिबानी दहशतवादी किमान तीन-चार लोक दररोज मारतात. अशा भयानक परिस्थितीत आम्ही तिथे सात रात्री काढल्यात, अशी माहिती त्यांनी दिली.
Many people in Afghanistan don't have travel documents. We had to wait from 12 midnight to 10 am in the hot weather. There were incidents of firing around the airport every day. 3-4 people died daily: Afghan MP Anarkali Kaur Honaryar in Delhi — ANI (@ANI) August 23, 2021
Many people in Afghanistan don't have travel documents. We had to wait from 12 midnight to 10 am in the hot weather. There were incidents of firing around the airport every day. 3-4 people died daily: Afghan MP Anarkali Kaur Honaryar in Delhi
— ANI (@ANI) August 23, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय हवाई दलाने अफगाणिस्तानमधल्या भारतीयांना आणि अन्य नागरिकांना मानवतेच्या भावनेतून भरपूर मदत केली. त्यांच्या मदतीमुळेच आम्ही भारतात सुखरूप येऊ शकलो, अशा भावना खासदार अनारकली कौर होनारयार यांनी व्यक्त केल्या आहेत.
अनारकली कौर होनारयार या अफगाणिस्तानातल्या आधीच्या लोकशाही राजवटीतील संसदेच्या सदस्य आहेत. लोकशाही राजवटीत मुस्लिम सोडून अन्य धर्मियांचे ही संसद सदस्य होते. याआधी अफगाण शीख खासदार नरेंद्र सिंग हे भारतात दाखल झाले आहेत. आज दुसऱ्या अफगाण शीख खासदार अनारकली कौर होनारयार या भारतात दाखल झाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App