वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अफगाणिस्तानच्या संसदेतले खासदार नरेंद्रसिंग खालसा यांना भारतात सुरक्षित परत आल्यानंतर अश्रू अनावर झाले. दिल्लीत त्यांचे विमान लँड होताच त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.Afghan Sikh MP Narendra Singh Khalsa sheds tears after landing in Delhi; Said, “It’s all over !!
ते म्हणाले की, गेल्या वीस वर्षात भारतीयांच्या आणि अन्य जगाच्या मदतीने अफगाणिस्तानने जे कमावले ते गेल्या आठ दिवसात सगळे गमावले आहे. सगळे संपले आहे. अफगाणिस्तानात वीस वर्षात शांतता, सहिष्णुता यांचे राज्य होते. सर्व समुदाय एकमेकांमध्ये मिळून-मिसळून राहत होते
परंतु आता तालिबानच्या राजवटीत हे सगळे संपुष्टात आले आहे. आम्हाला तिथे रहावेसे वाटत नाही म्हणून आम्ही भारतात आलो आहोत, अशा शब्दात खासदार नरेंद्र सिंग खालसा यांनी अफगाणिस्तानातच्या परिस्थितीचे वर्णन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारताने अफगाणिस्तानला नवे संसद भवन बांधून दिले. त्याला “अटल ब्लॉक” असे नाव आहे. त्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी आणि तालिबान राजवटीत अफगाणिस्तान सोडून निघून गेलेले अध्यक्ष अशरफ घनी यांच्या हस्ते झाले होते.
याच संसदेत नरेंद्र सिंह खालसा हे संसद सदस्य होते. परंतु आता अफगाणिस्तानातील लोकशाही राजवट संपली. तिथे आता तालिबानी जुलमी राजवट आली आहे. त्यामुळेच नरेंद्र सिंह खालसा यांना दिल्लीत उतरताच अश्रू अनावर झाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App