जनआशीर्वाद यात्रा : शिवाजी पार्कवरील प्रवेशापूर्वीच कारवाईला सुरुवात, मुंबई मनपाने नारायण राणेंचे बॅनर हटवले!

मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस बरसत आहे. दरम्यान मुंबई मनपाने माहिम, शिवाजी पार्क भागात मुंबई मनपा कर्मचाऱ्यांनी अनधिकृत बॅनरवर कारवाई करत या भागातील बॅनर हटवले. Narayan Rane’s Jan Ashirwad Yatra today, action started before entry on Shivaji Park, Narayan Rane’s greeting banner removed!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जनआशीर्वाद यात्रा  सुरू आहे. देशासह महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री तथा नवनियुक्त मंत्री जात आहेत. नव्याने मंत्री झालेले भाजप नेते नारायण राणे आज मुंबईमध्ये जनतेचा आशीर्वाद मागणार आहेत. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आजपासून मुंबईमध्ये जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात करणार आहेत.

मात्र, या यात्रेवर पावसाचं सावट पसरलं आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस बरसत आहे. दरम्यान मुंबई मनपा कर्मचाऱ्यांनी माहिम, शिवाजी पार्क भागातील नारायण राणे यांच्या अनधिकृत शुभेच्छा बॅनरवर कारवाई करत या भागातील बॅनर हटवले.



नारायण राणे यांच्या आगमनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नितेश आणि निलेश राणे हे मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यांच्यासोबत भाजप नेते प्रमोद जठार आणि कालिदास कोळंबकर हेदेखील उपस्थित होते. नारायण राणे यांचं सकाळी 10 वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे.

त्यानंतर शिवसेनेच्या गड असलेल्या शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला राणे वंदन करतील. तेथे ते वृक्षारोपणही करणार आहेत. तिथूनच जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात होणार आहे.

बाळासाहेब हे कुण्या पक्षाचे नेते नसून सर्व राष्ट्राचे नेते आहेत. ठाकरे कुटुंबाने राणेंना स्मारकावर यायला विरोध केला नाही, शिवसेनेच्या इतर नेत्यांनीदेखील मोठे मन करावे. 2024 मध्ये कोण किती पाण्यात आहे हे दिसेल, असं आव्हान भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिलं. नारायण राणेंचं मुंबईत आगमन झाल्यानंतर विमानतळावरून ते थेट शिवाजी पार्कात जाणार आहेत. तिथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ते वंदन करतील. तिथेच शेजारी असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी राणे जाणार का?, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.

Narayan Rane’s Jan Ashirwad Yatra today, action started before entry on Shivaji Park, Narayan Rane’s greeting banner removed!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात