भारताबरोबर सुदृढ संबंध ठेवण्याची तालिबानला अपेक्षा, भारत – पाक वादात हस्तक्षेप नाही

वृत्तसंस्था

काबूल : भारताबरोबर चांगले व मजबूत संबंध प्रस्थापित व्हावे, अशी तालिबानची इच्छा असल्याचे या संघटनेचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद याने स्पष्ट केले. Taliban will maintain good relations with India

भारताचे राजनैतिक अधिकारी येथे एकदम सुरक्षित राहू शकतील. कोणालाही नव्या राजवटीला घाबरण्याचे व देश सोडण्याची गरज नाही, असेही तो म्हणाला.

भारताबरोबर तालिबानला चांगले संबंध हवे आहेत, त्याचबरोबर भारत-पाकिस्तानमधील वादात हस्तक्षेप न करणार नसल्याची भूमिका त्याने मांडली.
या दोन्ही देशांमधील संबंध आहेत, या त्यांच्या आपसांतील प्रश्न आहे.



तालिबान यात लक्ष घालणार नाही, असे मुजाहिदने सांगितले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने अफगाणिस्तानच्या भवितव्याबाबत काही मुद्दे मांडले. तालिबानी सत्तेतही महिलांना शिकण्याची संधी दिली जाईल. त्या घराबाहेर पडून कामही करू शकतील. फक्त एकच अट आहे ती म्हणजे शरिया कायद्याचे त्यांनी कठोर पालन केले पाहिजे. तसेच त्यांनी हिजाब घालणे अनिवार्य आहे, असे सांगण्यात आले.

Taliban will maintain good relations with India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात