तालिबानी सत्तेला एकतर्फी मान्यता नको, अफगानी नागरिकांसाठी ब्रिटनने जाहीर केली पुनर्वसन योजना

विशेष प्रतिनिधी

लंडन – तालिबानी सत्तेला मान्यता द्यायचीच असेल तर ती आंतरराष्ट्रीय पातळीवरून दिली जाईल, कोणत्याही देशाने एकतर्फी मान्यता देऊ नये, असे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी केले आहे. Britan warns world about Taliban

जॉन्सन यांनी अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशीही चर्चा केली.

इम्रान खान यांच्याबरोबर बोलताना जॉन्सन यांनी, तालिबानी सत्तेला कोणत्याही देशाने परस्पर मान्यता न देता आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा करून एकमताने योग्य तो निर्णय घेण्याची आवश्यतकता व्यक्त केली. तालिबानी सत्तेने सर्व जगाला मान्य असलेल्या नियमांचे आणि मानवाधिकारांचे पालन केले तरच भविष्यात त्यांच्या सरकारला मान्यता मिळण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानमधील नागरिकांसाठी ब्रिटन सरकारने पुनर्वसन योजना जाहीर केली आहे. गेली वीस वर्षे आमच्याबरोबर अफगाणिस्तानात काम केलेल्यांचे आम्ही ऋणी आहोत, असे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी योजना जाहीर करताना सांगितले.

पुनर्वसन करताना महिला, मुली आणि अल्पसंख्याकांना अधिक प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले. या योजनेचा तपशील जाहीर झाला नसला तरी, येत्या काही वर्षांत वीस हजार अफगाणींना ब्रिटनमध्ये आश्रय दिला जाणार असून या वर्षभरात पाच हजार जणांना या योजनेचा फायदा होईल.

Britan warns world about Taliban

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात