विशेष प्रतिनिधी
काबूल : तालीबानने अफगणिस्थानवर ताबा मिळविला असला त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार आहे. कारण अमेरिकेने अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेची सुमारे ९.५ अब्ज डॉलर्सची मालमत्ता गोठवली आहे. तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकारला हे पैसे दिले जाणार नाहीत. त्याचबरोबर अमेरिकेत असलेल्या अफगाण सरकारच्या मालमत्तांवरही तालीबान सरकारचा अधिकार राहणार नाही.The United States has frozen 9.5 billion in assets in Afghanistan
अफगणिस्थानची मध्यवर्ती बँके असलेल्या दा अफगाण बँकेचे कार्यवाहक प्रमुख अजमल अहमदी यांनी सोमवारी सकाळी ट्विट केले की त्यांना शुक्रवारी समजले की अमेरिकेने डॉलर्सची शिपमेंट पूर्णपणे थांबवली आहे. कारण तालीबानला या पैशांपासून रोखायचे आहे. दा अफगाण बॅँकेकडे सध्या ८.५ अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे. त्यातील मोठा भाग हा न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्ह बॅँक आणि आर्थिक संस्थांमध्ये ठेवलेली आहे. सोने, शेअर्स आणि रोकड मिळून ७ अब्ज डॉलर्सची गुंतवुणूक आहे.
तालिबानवर अमेरिकेने निर्बंध घातल्यामुळे आता ही मालमत्ता सरकारला मिळू शकत नाही. बॅँकेची बहुतांश मालमत्ता ही सध्या अफगणिस्थानबाहेर आहे. काही मालमत्ता ही स्वित्झर्लंडमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय बॅँकेत आहेत. बॅँकेची केवळ ०.२ टक्के मालमत्ता ही प्रत्यक्षात अफगणिस्थानमध्ये आहे. त्यामुळे तालीबानला केवळ तेवढीच वापरता येऊ शकणार आहे.
अफगाणिस्तानच्या चालू खात्यात मोठ्या प्रमाणात तूट आहे. अफगाण बॅँकेला अमेरिकेतून दर आठवड्याला डॉलर्सची शिपमेंट पाठविली जाते. ही शिपमेंट आता पाठविली जाणार नसल्याने रोकड जवळपास संपल्यात जमा झाली आहे.
अहमदी म्हणाले की, त्यांना सांगण्यात आले आहे की तालिबान बँक कर्मचाऱ्यांना सतत मालमत्तेच्या स्थानाबद्दल विचारत आहेत. परंतु मालमत्ता कोठे आहे हे माहिती झाले तरी त्यांना तेथपर्यंत पोहोचणे अवघड आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App