मार्च महिन्यात जुहू परिसरातून उघडकीस आणलेल्या ड्रग्स रॅकेटचा मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. ATS : Major operation of anti-terrorism squad, mastermind of international drug racket arrested in Delhi
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मार्च महिन्यात जुहू परिसरात एटीएसने कारवाई करत 2 कोटी 53 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त केले होते. या गुन्ह्यात आरोपी सोहेल युसूफ मेमन याला अटक करण्यात आली होती. तर निरंजन जयंतीलाल शाह याला वॉन्टेड घोषित करण्यात आलं होतं.ATS : Major operation of anti-terrorism squad, mastermind of international drug racket arrested in Delhi
आता ओरोपी निरंजन शाह याला दिल्लीत अटक करण्यात आली. शाह हा बहुचर्चित शेअर घोटाळ्यातील आरोपी हर्षद मेहताचा सहकारी होता.
त्याच्यावर मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांना गुंगारा देत तो अनेक दिवस फिरत होता. अखेर दहशतवादी विरोधी पथकाच्या जुहू युनिटने त्याला दिल्लीत बेड्या ठोकल्या आहेत. त्याला 25 ऑगसपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अँटी नारकोटिक्स सेलची कारवाई सुरू
मुंबई पोलिसांची ड्रग्स विरोधात काम करणारी अँटी नार्कोटिक्स सेल म्हणजे अंमली पदार्थ विरोधीपथकाने ड्रग्स माफिया विरोधात मोहीमच सुरु ठेवली आहे. अँटी नार्कोटिक्स सेलमार्फत या वर्षाच्या सुरुवाती पसून आतापर्यंत एकूण 10 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 6 कोटी 38 लाख किंमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. यामध्ये 1335 ग्रॅम एमडी ड्रग्स आणि 1614 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं आहे.
नायजेरियन माफियांचा संघटीतरित्या व्यवसाय
विशेष म्हणजे परदेशी नागरीक सुरुवातीला काहीतरी कारण देऊन जसं की नोकरी, उपचारचा आधार घेऊन मुंबईत येतात. नंतर ते इथेच स्थायीक होऊन ड्रग्स व्यवसायात गुंततात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App