विशेष प्रतिनिधी
बिजिंग – अफगणिस्तानसोबत मैत्रीपूर्ण सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे चीन सरकारच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.चीनचा प्रवक्ता म्हणाला, तालिबानने याआधी अनेकवेळा चीनसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.China will ready to back taliban
देशाची पुनर्बांधणी आणि विकासामध्ये त्यांना चीनची भूमिका आवश्यआक वाटते. याआधी आश्वावसन दिल्याप्रमाणे तालिबानी हे तिथे अधिक खुली इस्लामी राजवट आणतील अशी अपेक्षा आहे.चीनने अफगाणिस्तानातील त्यांचा दूतावास सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून अमेरिका आणि रशियानेदेखील तोच कित्ता गिरवला आहे.
अमेरिकेच्या माघारीनंतर चीन सरकार तालिबान्यांशी अनौपचारिक संबंध प्रस्थापित करण्यास उत्सुक असल्याचे दिसून आले आहे.चीनची अफगाणिस्तानला देखील सीमा लागून असून तिची लांबी तब्बल ७६ किलोमीटर एवढी आहे. शिनजियांग प्रांतातील उघूर मुस्लिमांना आता तालिबानी आश्रय देऊ शकतात, अशी भीती चीन सरकारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App