विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागच्या दीड वर्षापासून सरकारी जागांची भरती थांबलेली होती. त्यामुळे बेरोजगार तरुण नैराश्यात होते. हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे जागा निघायला सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) व कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) आणि श्रम आणि रोजगार मंत्रालयात उपसंचालक पदासाठी एकशे एक्कावन्न (151) रिक्त जागांसाठी भरती काढली आहे. Government Job Recruitment 2021 151 vacancies for deputy director in ESIC notified
151 रिक्त पदांपैकी
66 जागा UR उमेदवारांसाठी
23 जागा SC उमेदवारांसाठी
STउमेदवारांसाठी 09
OBC उमेदवारांसाठी 38
EWS उमेदवारांसाठी 15 आणि
PwBD उमेदवारांसाठी 04 जागा आहेत.
कामगार आणि रोजगार मंत्रालय, कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) मध्ये उपसंचालक पदासाठी एकशे एक्कावन्न (151) रिक्त जागा भरण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) ऑनलाइन अर्ज भरण्यास सांगितले आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार 2 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी 11.59 वाजेपर्यंत ORA वेबसाइट (http://www.upsconline.nic.in) द्वारे पदांसाठी ऑनलाईन अर्ज (ORA) सबमिट करू शकतात.फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबरपर्यंत आहे.
ह्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची गरज पुढीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
अनुभव : उमेदवारास प्रशासन/ लेखा/ विपणन/ सार्वजनिक संबंध/ विमा/महसूल/ सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/ स्वायत्त संस्थेत कर संबंधित बाबींचा तीन वर्षांचा अनुभव असावा.
उपसंचालक पदाच्या भरतीतून मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची संगणक आधारित भरती परीक्षा (CBRT) यूपीएससीद्वारे घेतली जाईल. CBRTची तारीख उमेदवारांना नंतर कळवली जाईल.
SBI नेट बँकिंग सुविधेचा वापर करून किंवा व्हिसा/मास्टर क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून फक्त 25 रुपये शुल्क भरावे लागेल. कोणत्याही समाजाच्या SC/ST/PwBD/महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस पुरुष उमेदवारांना “फी सवलत” उपलब्ध नाही आणि त्यांना पूर्ण शुल्क भरणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App