वृत्तसंस्था
नवी दिल्ली : महिला काँग्रेसच्या अध्यक्ष, आसाममधल्या मातब्बर नेत्या, माजी खासदार सुष्मिता देव यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये राजकीय भूकंपाचे तरंग उठले आहेत. सुष्मिता देव आमच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांचे वडील संतोष मोहन देव यांनी आणि त्यानंतर स्वतः सुष्मिता देव यांनी काँग्रेसची मोठी सेवा केली आहे. आसामच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी अविचार करून राजीनामा देऊ नये. काँग्रेस नेतृत्वाशी त्यांनी चर्चा करावी. राजीनामा मागे घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे खासदार रिपून बोरा यांनी केले आहे. Former Congress MP Sushmita Dev resigns from the party
तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून दररोज काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधणाऱ्या कपिल सिब्बल यांनी सुष्मिता देव यांच्या राजीनाम्याच्या निमित्त पुन्हा एकदा काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधण्याची संधी साधली आहे. तरुण नेते काँग्रेस सोडून चाललेत आणि आपण म्हातारे त्याकडे डोळेझाक करतो आहे किंवा डोळे विस्फारून बघतो आहे. भावी पिढ्या आपल्यासारख्या वृद्ध नेत्यांना यासाठी दोष देतील ,असा इशारा कपिल सिब्बल यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिला आहे.
Former Congress MP Sushmita Dev resigns from the party (file photo) pic.twitter.com/tlEyG5aKxX — ANI (@ANI) August 16, 2021
Former Congress MP Sushmita Dev resigns from the party
(file photo) pic.twitter.com/tlEyG5aKxX
— ANI (@ANI) August 16, 2021
काँग्रेसच्या अधिकृत प्रवक्त्याने सुष्मिता देव यांच्या राजीनाम्यावर अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. राहुल गांधी सध्या त्यांचा मतदारसंघ वायनाडच्या दौर्यावर आहेत सोनिया गांधी यांनी 20 ऑगस्ट रोजी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलविली आहे. त्याला ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन आदी मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बाकीच्या पक्षांना सोनिया गांधी आवाहन करत आहेत. परंतु काँग्रेस मजबूत राहिली संघटना वाढली तरच विरोधी एकजुटीला खरा अर्थ प्राप्त होईल, असे मत कपिल सिब्बल यांनी परवाच व्यक्त केले होते. आणि आज सुष्मिता देव यांचा यांच्या सारख्या महत्त्वाच्या नेत्याचा राजीनामा आला आहे.
एकूणच सुष्मिता देव यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता असल्याचे स्पष्ट होत आहे. सुष्मिता देव यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असला तरी त्या भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत. भाजपच्या नेत्यांशी त्यांचा संपर्क आलेला नाही. काँग्रेसचा राजीनामा ही त्यांची वैयक्तिक आणि पक्षांतर्गत बाब आहे, असे आसाम भाजपचे सरचिटणीस खासदार डॉक्टर राजदीप राय यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App