विरोधी ऐक्यासाठी सोनिया गांधींचाही पुढाकार; पण आपल्या खासदारांवरील कारवाई टाळण्यासाठी…!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार विरोधात असणाऱ्या सर्व पक्षांच्या ऐक्यासाठी एकापाठोपाठ एक बडे नेते पुढाकार घेत असताना त्यामध्ये सर्वात मोठ्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही समावेश झाला आहे. मात्र, विरोधी ऐक्याचे ऐक्यासाठी त्यांनी पुढाकार घेण्याचे कारण मात्र वेगळे आहे. Congress Interim President Sonia Gandhi has called a virtual meeting of like-minded Opposition parties on August 20.

राज्यसभेत झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर काँग्रेसच्या खासदारांवर निलंबनाची वेळ येऊ शकते. ही कारवाई टाळण्यासाठी राज्यसभेचा सभापतींवर दबाव आणण्याची एक खेळी म्हणून सोनिया गांधी विरोधकांचे ऐक्य घडवू इच्छित आहेत. राज्यसभेत गोंधळ घालणारे सदस्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते याचे सूतोवाच राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. सरकारने राज्यसभेतील गोंधळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून सविस्तर अहवाल तयार केला आहे. तो सभापतींकडे पाठविला आहे. त्यावर योग्य तो विचार करून लवकरात लवकर निर्णय घेऊ असे व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी विरोधी ऐक्यासाठी पुढाकार घेतला आहे

20 ऑगस्टला सोनिया गांधी यांनी सर्व विरोधी पक्षांची व्हर्चुअल मीटिंग बोलावली आहे. यामध्ये विरोधी ऐक्यासाठी सर्वात आधी प्रयत्न करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी नेते उपस्थित राहणार असल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे. उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. परंतु ममता बॅनर्जी या स्वत: उपस्थित राहतील की त्या आपल्याच एखाद्या खासदाराला प्रतिनिधी म्हणून पाठवतील हे अद्याप समजलेले नाही.

ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत पाच दिवस मुक्काम करून सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याआधी त्यांच्याच तृणमूळ काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंचाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी घेतली होती. त्याला काँग्रेसच्या नेत्यांना बोलविण्यात आले होते. परंतु ते हजर राहिले नव्हते.

आता सोनिया गांधी यांनी 20 ऑगस्टला बोलाविलेल्या सर्व विरोधी नेत्यांच्या बैठकीस कसा प्रतिसाद मिळतो? तसेच राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांवरची कारवाई टळते का? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

Congress Interim President Sonia Gandhi has called a virtual meeting of like-minded Opposition parties on August 20.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात